आरोग्य अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे
पुणे | महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ आशिष भारती यांची राज्य सरकारकडून बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य अधिकारी तथा आरोग्य विभाग प्रमुखाचे पद रिक्त झाले आहे. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे देण्यात आला आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
डॉ आशिष भारती यांचा महापालिकेतील कार्यकाळ संपुष्टात आल्याने राज्य सरकारकडून त्यांची बदली करण्यात आली आहे. उपसंचालक, आरोग्य सेवा या पदावर त्यांची बदली केली आहे. दरम्यान डॉ भारती यांच्या बादलीने महापालिकेचे आरोग्य अधिकारी हे पद रिक्त झाले आहे. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार उप आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे देण्यात आला आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्याकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.