आता हडपसरला कचरा प्रकल्प नको!
: राष्ट्रवादीचे नगरसेवक मुख्य सभेत आक्रमक
पुणे: शहरात कचर्याचे सर्व प्रकल्प हडपसर भागात नको, असे म्हणत गुरुवारच्या मुख्य सभेत राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक चांगलेच आक्रमक पाहायला मिळाले. पुण्यातील मेट्रो प्रकल्प पहिल्यांदा हडपसरला का केलानाही, पेठांमध्ये कचर्याचा प्रकल्प का केला जात नाही अशा आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नव्याने होणार्या सॅनटरी वेस्ट डिसपोजल प्रकल्पाला विरोध करण्यात आला. त्यामुळे याप्रस्तावावर मतदान घेण्यात आले. उपसुचनेसह 72 विरुध्द 26 मतांना या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
: काँग्रेस राहिली तटस्थ; मात्र अरविंद शिंदेंचे मतदान
महापालिकेच्या घनकचरा विभागाकडुन हडपसर याठिकाणी सॅनटरी वेस्ट शास्त्रोक्त पध्दतीन विल्हेवाट लावण्याकरत एका कंपनीकडुन प्रकल्प करण्यात येणार आहे. ही कंपनी 25 कोटी रुपये खर्च करुन याठिकाणी यंत्रसामग्री उभारण्यात येणार आहे.पहिल्या तीन वर्ष हा प्रकल्पासाठी कोणतेही पैसे महापालिकेला मोजावे लागणार नाहीत. तीन वर्षानंतर महापालिकेला पैसे द्यावे लागतील. यानंतर मुदत वाढीचा निर्णय महापालिका आयुक्त करणार होते. मात्र याप्रस्तावाला उपसुचना देण्यात आली. तीन वर्षानंतर मुदतवाढीसाठी स्थायी समितीचीमंजूरी घेवून सर्वसाधारण सभेची मान्यता घावी अशी उपसुचसह प्रस्ताव मान्य करण्यात आला.
कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी आणखी एक प्रकल्प हडपसर भागात होणार आहे. याप्रकल्पाला हडपसर भागातील नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. याविषयी नगरसेविका वैशाली बनकर म्हणाल्या, महापालिका प्रशासनाला वार्तानकूलित कार्यालयात बसून हडपसरभागातील नागरिकांचे प्रश्न कळणार नाहीत. प्रत्येकवेळी शास्त्रोक्त पध्दतीने कचर्याची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. पुणे शहराचा संपुर्ण कचरा हडपसर भागात जिरवला जात आहे. आमच्याकडे ज्याप्रमाणे कचरा पाठवता त्याप्रमाणे मेट्रो सुध्दा पहिल्यांदा हडपसर भागात का केली नाही. महापालिका प्रशासन केवळ दिखावू पणा करत आहे. स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या पाहणीच्यावेळी केवळ दिखावा करण्यात येतो असे बनकर म्हणाल्या. महापौर मुरलीधर मोहळ यांनी यावर आक्षेप घेतला. महापालिका प्रशासनाने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक आपण करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केल्यामुळे प्रस्ताव 72 विरुध्द 26 मतांनी मान्य झाला. याप्रस्तावावर काँग्रेसने तटस्थ भुमिका घेतली. काँग्रेस ची ही भूमिका असली तरी मात्र नगरसेवक अरविंद शिंदे यांनी एकट्याने प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे त्यांच्या भूमिके विषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
COMMENTS