NCP Pune | पुण्याला कोणी पालकमंत्री देता का.. पालकमंत्री …..?

HomeBreaking Newsपुणे

NCP Pune | पुण्याला कोणी पालकमंत्री देता का.. पालकमंत्री …..?

Ganesh Kumar Mule Jul 26, 2022 12:41 PM

New Government | MLA Sunil Kamble | आमदार सुनील कांबळे यांना मंत्रिपद! | चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री 
Guardian ministers | चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री | नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर
Ajit Pawar Vs Chandrakant Patil | पुण्यात पाटील विरुद्ध पवार चुरस पाहायला मिळणार 

पुण्याला कोणी पालकमंत्री देता का.. पालकमंत्री …..?

| पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनोखे  आंदोलन

राज्यात सरकार स्थापन होऊन एक महिना होत आला तरी दोनच मंत्री काम करत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही हा महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेचा अपमान असून सरकारने तातडीने अधिवेशन बोलावून मंत्रिमंडळ व सर्व पालकमंत्र्यांची नियुक्ती करावी. अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

पुणे शहर व जिल्हा राज्याचे प्रमुख शैक्षणिक,औद्योगिक व राजकीय केंद्र असून पुण्याचा कारभार गेल्या १ महिन्यापासून पालकमंत्र्यांशिवाय सुरू आहे. राज्यात सध्या अतिवृष्टीचे संकट ओढावले असून या आपत्कालीन परिस्थितीत जर मंत्रीच नसतील तर या खात्यांचा कारभार कोणाच्या भरवश्यावर सुरू असा सवाल देखील या वेळी विचारण्यात आला.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,” मा. मुख्यमंत्री आणि मा.उपमुख्यमंत्री हे दोघेच काम करत असल्यामुळे अनेक बाबींकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. मागच्या एका महिन्यात राज्यातील विविध भागांमध्ये तब्बल ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठले राज्य सरकार स्थापन झाल्या नंतर एका महिन्यात इतक्या जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही बाब महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे.

“राज्यातील या सर्व आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने अधिवेशन बोलवावे व ओला दुष्काळ जाहीर करत या ८९ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरीव मदत द्यावी”,अशी मागणी यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.

महाविकास आघाडी सरकार असताना १८ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन घेण्याचे ठरविले होते. मात्र सत्ताबदल झाल्यानंतर २५ जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली होती. आता २५ जुलै होऊनही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तारच झालेला नाही. सरकारकडे बहुमत आहे तर अधिवेशन घ्यायला सरकारला भीती का वाटत आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
तसेच राज्यात नवे सरकार आल्यानंतर जुन्या सरकारच्या योजनांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला जातोय. वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या सरकारच्या काळात महाविकास आघाडी सोबत काम केले आहे. तरीही त्यांनी जुनी कामे स्थगित करण्याचा दणका लावला आहे. कोणतेही सरकार हे कायम नसते, हे दोन्ही नेत्यांनी समजून घ्यायला हवे. मविआ सरकारने पुण्यातील वढू येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी २६५ कोटींचा आराखडा केला होता, त्याचा निधी थांबविण्यात आला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या कामासंबंधी निधी दिला होता, तोही थांबविण्यात आला आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विचारांचे जतन करण्यासाठी काही कामे हातात घेतली होती, त्यांचे शौर्य लोकांना कळावे अशी त्यामागची भावना होती. या कामांचा निधी थांबविण्याचे काहीच कारण नव्हते. इतक्या खालच्या पातळीचे राजकारण कधीच झाले नव्हते, असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

*या आंदोलनाचे विशेष म्हणजे या आंदोलनात नटसम्राट गणपतराव बेलवलकरांची आठवण करत प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी *……….
|| हे विघात्या तु ईतका कठोर का झालास||

*||हे करूना करा आम्ही पुणेकरांनी कोणाच्या कडे कामे धेवून जायचे *

*पुण्याला , खड्ड्यांची चाळण झालेल्या ह्या शहराला *

*ट्रॅफिक मध्ये जाम मघ्ये आडकलेल्या ह्या शहराला *

अनेक अडचणी असणा-या ह्या शहराला

*कोणी पालक मंत्री *
देता का पालकमंत्री
पालकमंत्री हा संवाद म्हणून दाखवत सरकारला धारेवर धरल

आंदोलनात प्रवक्ते प्रदीप देशमुख मृणालिनी वाणी , किशोर कांबळे विक्रम जाधव , आनंद सवाने , समीर शेख , दिपक जगताप , वेणू शिंदे , शंतनू जगदाळे , नाना नलावडे , महेंन्द्र पठारे व प्रदीप गायकवाड व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते