Divyang PMPML Free Pass | ग्रामीण भागातील दिव्यांगांना पीएमपी चा मोफत बस पास देण्याबाबत उदासीनता 

HomeBreaking Newsपुणे

Divyang PMPML Free Pass | ग्रामीण भागातील दिव्यांगांना पीएमपी चा मोफत बस पास देण्याबाबत उदासीनता 

Ganesh Kumar Mule Jun 10, 2023 8:59 AM

No water cut since Friday | पुणेकरांना दिलासा | शुक्रवार पासून पाणीकपात नाही | दररोज पाणीपुरवठा सुरळीत राहणार 
Senior Citizens Health | शामाप्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरीक मोफत तपासणी पूर्ववत करा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे आयुक्‍तांना निवेदन
Pune Metro News | मेट्रो पुणेकरांच्या सोयीसाठी की, भाजपच्या राजकीय फायद्यासाठी – माजी आमदार मोहन जोशी

Divyang PMPML Free Pass | ग्रामीण भागातील दिव्यांगांना पीएमपी चा मोफत बस पास देण्याबाबत उदासीनता

| पीएमपी सीएमडीनी मागणी करूनही दोन्ही मनपा आणि पीएमआरडीए कडून प्रतिसाद नाही

Divyang PMPML Free pass | ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिना (Divyang In Rural Area) पीएमपीएमएलचा  (PMPML) मोफत बस प्रवास पास (Free Bus Pass)  मिळणेबाबत वेगवेगळ्या संघटनांकडून मागणी करण्यात आली आहे. मनविसे देखील (MNVS) याची मागणी पीएमपीकडे (PMPML pune) केली आहे. त्या अनुषंगाने  पुणे (PMC Pune) व पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpari Chinchwad Municipal Corporation) आणि पीएमआरडीए (PMRDA) कडे याबाबतचे धोरण तयार करण्याची मागणी पीएमपीचे सीएमडी ओमप्रकाश बकोरिया (PMPML CMD Omprakash Bakoria) यांनी केली आहे. मात्र तिन्ही संस्थांकडून याबाबत कुठलाही प्रतिसाद अजून पीएमपीला मिळालेला नाही. यावरून दिव्यांगांबाबतची उदासीनता दिसून येत आहे. (Divyng PMPML free pass)

पुणे व पिंपरी महानगरपालिकेकडील समाज विकास विभागाचे (Social Devlopment Department) धोरणानुसार त्या त्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहाणाऱ्या दिव्यांग व्यक्तीनां दरवर्षी महामंडळामार्फत १००% अनुदानीत पासेस देण्यात येतात. याकरीता दोन्ही महानगरपालिकांमार्फत मार्च महिन्याच्या अखेरीस वर्तमानपत्रात जाहिर प्रकटन देवून ऑनलाईन अर्ज मागविणेत येतात. त्यानुसार त्या त्या महानगरपालिकांकडून प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र अर्जदारांची यादी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे(PMPML) पाठविणेत येते. सदर यादीनुसार त्या त्या मनपा हद्दीतील दिव्यांग व्यक्तिनां महामंडळामार्फत वार्षिक मोफत बस प्रवास पास देणेत येतो. तसेच त्या त्या मनपा हद्दीतील दिव्यांग व्यक्तिचे वार्षिक मोफत बस पास पोटीचे १००% अनुदान दरवर्षी त्या त्या महापालिकांकडून महामंडळास प्राप्त होते. (PMPML Pune News)
तथापि ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिनां मोफत बस प्रवास पास दयावयाचा झालेस या पासेस पोटीचे अनुदान पीएमपी महामंडळास मिळणे आवश्यक आहे. सद्य स्थितीत दोन्ही महानगरपालिकांकडून ग्रामीण
भागातील दिव्यांग व्यक्तिंचे मोफत बस प्रवास पास पोटीचे कोणतेही अनुदान प्राप्त होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिीनां सदया मोफत बस प्रवास पास सवलत देणेत येत नाही. (PMP bus pass News)
ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिनां मोफत बस प्रवास पास देणे बाबत वारंवार मागणी होत असल्याने याअनुषंगाने दोन्ही महापालिकांना महामंडळामार्फत नुकताच लेखी पत्र व्यवहार करणेत आलेला आहे. परंतु
दोन्ही महापालिकांकडून अद्याप याबाबतचे धोरण प्राप्त झालेले नाही. तरी पुणे व पिंपरी चिंचवड मनपाचे हद्दीतील दिव्यांग व्यक्तिनां देणेत येणारे मोफत बस पासचे धोरणाप्रमाणेच ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिनां मोफत बस प्रवास पास दयावयाचा झालेस सदर पासेस पोटीचे अनुदान पीएमआरडीएकडून महामंडळास मिळाल्यास महामंडळामार्फत ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिनां मोफत बस प्रवास पास देणेस हरकत नाही. यास्तव ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तिनां मोफत बस प्रवास पास दयावयाचा झालेस सदर पासेसपोटीचे अनुदान पीएमआरडीएकडून महामंडळास मिळणेबाबतचे धोरण निश्चित करून महामंडळास त्याबाबतचा प्रस्ताव सादर करणे विषयी विनंती आहे. जेणे करून याबाबतची पुढील कार्यवाही करणे महामंडळास शक्य होईल. असे पीएमपीचे सीएमडी ओमप्रकाश बकोरिया यांनी मागणी केली होती. मात्र याबाबत कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही.
पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. पुणे जिल्हा आणि बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थी शिकण्यासाठी पुण्यात येतात. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह  राज्यातील अंध व अपंग विद्यार्थी व नागरिकांना मोफत बस सेवा दिली पाहिजे. अशी मनविसे ने मागणी केली आहे.
प्रशांत कनोजिया, मनविसे 
—–
News Title | Divyang PMPML Free Pass | Indifference towards providing free bus pass of PMP to disabled people in rural areas| There is no response from both Municipalities and PMRDA despite demand by PMP CMD