Khadakwasla Water Discharge | खडकवासलातून पाण्याचा विसर्ग केला बंद | पावसाचा जोर ओसरला 

HomeपुणेBreaking News

Khadakwasla Water Discharge | खडकवासलातून पाण्याचा विसर्ग केला बंद | पावसाचा जोर ओसरला 

Ganesh Kumar Mule Jul 19, 2022 8:40 AM

Canal Advisory Committee | पुण्यात पाणीकपात लागू होणार का? आज होणार निर्णय  | दुपारी कालवा समितीची बैठक
Dr Rajendra Bhosale IAS | आपण सनदी नोकर आहात महापालिकेचे मालक नाही | महापालिका आयुक्तांवर विवेक वेलणकर कडाडले!
Heavy Rain in pune | बाहेर पडताना काळजी  घ्या | खडकवासला धरणातून 30 हजार क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग

खडकवासलातून पाण्याचा विसर्ग केला बंद | पावसाचा जोर ओसरला

| चार धरणात 18.89 TMC पाणी जमा

खडकवासला धरण साखळीतील पावसाचा जोर ओसरल्याने खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग आज सकाळी सहा वाजता पूर्ण बंद केला आहे. खडकवासला धरण सध्या १०० टक्के भरले आहे. परंतु या धरणात मागील चार- पाच दिवसात मोठा पाऊस झालेला नाही. पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाला आहे. परिणामी ओढ्याचे पाणी कमी झाल्याने धरणातील येवा बंद झाल्याने धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद केला आहे.

धरणातील विसर्ग एक हजार ७१२ क्यूसेक होता. तो आज पहाटे पाच वाजता ८५६ क्यूसेक केला. सहा वाजता पूर्ण बंद केला. खडकवासला धरण मागील मंगळवारी सकाळी(१२ जुलै रोजी) शंभर टक्के भरले होते. त्यानंतर त्यातून धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. आज सकाळी सहा वाजता बंद केला या दरम्यान धरणातून ३.३४टीएमसी पाणी मुठा नदीत सोडले. पुढे हे पाणी उजनी धरणात जमा होते.

खडकवासला धरण साखळीत मिळून एकूण पाणीसाठा १८.८९ टीएमसी झाला आहे. पानशेत आणि वरसगाव धरणांनंतर टेमघर धरणही निम्मे भरले आहे. खडकवासला धरणाच्या परिसरात सहा मिलिमीटर, पानशेत धरण क्षेत्रात ३२ मिलिमीटर, वरसगाव ३७ आणि टेमघर धरण क्षेत्रात २०मिलिमीटर पाऊस पडला आहे.