Dilip Vede Patil | एनडीए चौकात (चांदणी चौक) उभारण्यात आलेल्या अग्निशमन व प्रशिक्षण केंद्राला स्व. खासदार गिरीशभाऊ बापट यांचे नाव देण्याची मागणी

HomeBreaking Newsपुणे

Dilip Vede Patil | एनडीए चौकात (चांदणी चौक) उभारण्यात आलेल्या अग्निशमन व प्रशिक्षण केंद्राला स्व. खासदार गिरीशभाऊ बापट यांचे नाव देण्याची मागणी

Ganesh Kumar Mule Sep 07, 2023 1:09 PM

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडून चांदणी चौक उड्डाणपूल कामाची हवाई पाहणी
Chandni Chowk bridge | चांदणी चौक पूल पाडण्याच्यावेळी मुंबई-बंगळुरू महामार्गावरील पुणे शहरातील वाहतूक बंद रहाणार
FOB in Chandani Chowk | चांदणी चौकात पादचारी पूल उभारण्यात यावा! | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे विनंती

Dilip Vede Patil | एनडीए चौकात (चांदणी चौक) उभारण्यात आलेल्या अग्निशमन व प्रशिक्षण केंद्राला स्व. खासदार गिरीशभाऊ बापट यांचे नाव देण्याची मागणी

| दिलीप वेडे पाटील यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन

Dilip Vede Patil | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation l) वतीने एनडीए चौक (चांदणी चौक) स. नं ७७/१ येथे उभारण्यात आलेल्या अग्निशमन केंद्र व प्रशिक्षण केंद्राची उभारणी अखेरच्या टप्प्यात आहे. या प्रकल्पाची पायाभरणी व शुभारंभ २४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालक मंत्री स्व. गिरीशजी बापट (Girish Bapat) यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. तरी या प्रकल्पाचे नामकरण स्व. खासदार गिरीशभाऊ बापट अग्निशमन केंद्र व प्रशिक्षण केंद्र असे करण्यात यावे यासाठी पुणेकर आग्रही असून या मागणीचे निवेदन मा. नगरसेवक दिलीप वेडेपाटील (Dilip Vede Patil) यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांना दिले.
          यावेळी हा प्रकल्प होण्यामध्ये स्व. खासदार गिरीशभाऊ बापट यांचे मोलाचे असे योगदान असून त्यांचे नाव देणे अधिक योग्य ठरेल यावर आयुक्त साहेब यांच्याशी चर्चा झाली. तसेच अन्य महत्त्वाच्या मुद्यांवर निवेदन व धोरणात्मक चर्चा करण्यात आली यामध्ये पुढील मुद्यांचा समावेश होता: –
१. बावधन खुर्द येथे पुणे महानगरपालिकेतर्फे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणे बाबत.
२. पुणे महानगरपालिका शाळा क्र. १५३ बी व ८२ बी मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुदान त्वरित मिळावे यासाठी संबंधित विभागाला सूचना देण्यात याव्या.
३. पुणे महानगरपालिका शाळा क्र. १५३ बी व ८२ बी या दोन्ही शाळा एकाच सत्रात भरविणे.
४. पुणे महानगरपालिका शाळा क्र. १७३ बी कोकाटे वस्ती येथील शाळा बंद करून सदर शाळेचे समायोजन उपरोक्त नमूद शाळा क्र. १५३ बी व ८२ बी करणे
५. पुणे महानगरपालिका शाळा क्र. १५३ बी व ८२ बी या दोन्ही शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करणे व मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे.
६. पुणे महानगरपालिका शाळा क्र. १५३ बी व ८२ बी या दोन्ही शाळांमध्ये वर्ग खोल्यांत आवश्यक असणारे फर्निचर उपलब्ध होणे.
आयुक्त यांनी उपरोक्त सर्व विषयांच्या अनुषंगाने सकारात्मक प्रतिसाद देऊन शक्य ती सर्व कामे लवकरात लवकर करून घेतली जातील असे आश्वासन दिले व संबंधित सर्व विभागांना तश्या सूचना दिल्या. अशी माहिती दिलीप वेडे पाटील यांनी दिली.
——