Diabetes | मधुमेहावर ‘आयुर डायबेट’, तर रक्तदाबावर ‘आयुर कार्ड’ गुणकारी – वैद्य नीरज कामठे यांचे मत; सोहम सिद्धतत्वमकडून दोन नव्या आयुर्वेदीय स्वरस औषधांची निर्मिती

HomeBreaking News

Diabetes | मधुमेहावर ‘आयुर डायबेट’, तर रक्तदाबावर ‘आयुर कार्ड’ गुणकारी – वैद्य नीरज कामठे यांचे मत; सोहम सिद्धतत्वमकडून दोन नव्या आयुर्वेदीय स्वरस औषधांची निर्मिती

Ganesh Kumar Mule Apr 16, 2025 8:16 PM

Diabetes | मधुमेहाचा आजार डिटेक्ट झाला असल्यास जीवनशैलीत कोणते बदल करावे याबद्दल मार्गदर्शन
Health Tips for All | What is the root of all diseases? | its causes and solutions!
Obesity | health | वजन कमी करायचं आहे, आजार होऊ द्यायचे नाहीत, चला, भरडधान्याचे महत्व जाणून घेऊया!

Diabetes | मधुमेहावर ‘आयुर डायबेट’, तर रक्तदाबावर ‘आयुर कार्ड’ गुणकारी – वैद्य नीरज कामठे यांचे मत; सोहम सिद्धतत्वमकडून दोन नव्या आयुर्वेदीय स्वरस औषधांची निर्मिती

 

Hypertension – (The Karbhari News Service) – “मधुमेह व हृदयरोग यांसारख्या आजारांवर ‘आयुर डायबेट’ व ‘आयुर कार्ड’ स्वरस (ज्यूस) गुणकारी ठरेल. आयुर डायबेट स्वरसमुळे शरीरातील साखरेचे, तर आयुर कार्ड स्वरसमुळे रक्तदाबाचे व कोलेस्ट्रॉलचे प्रमाण संतुलित ठेवून हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल,” असे मत आयुर्वेदाचार्य वैद्य नीरज कामठे यांनी व्यक्त केले.

सोहम सिद्धतत्वम संस्थेने निर्मिलेल्या ‘आयुर डायबेट ज्यूस’ व ‘आयुर कार्ड ज्यूस’ या दोन आयुर्वेदीय स्वरसाचे लोकार्पण बुधवारी संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणपती बाप्पांसमोर करण्यात आले. त्यावेळी वैद्य नीरज कामठे बोलत होते. प्रसंगी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, खजिनदार महेश सूर्यवंशी, डॉ. मेघश्री कामठे, सोहम सिद्धतत्वमचे संस्थापक शुभम मुंदडा, मनमोहन मंत्री व निलेश सारडा यांच्यासह शामसुंदर मुंदडा, जयंत बोधे, कृष्णा मालाणी, दीपाली तिकोने, श्वेता मंत्री, वैष्णवी मुंदडा आदी उपस्थित होते.

वैद्य नीरज कामठे पुढे म्हणाले की, “संशोधनाच्या आधार घेऊन आयुर्वेदात अनेक चांगली औषधे येत आहेत, याचा आनंद आहे. द्रवरूपात आणलेली ही औषधे लवकर शरीरात मिसळतात व प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. येणाऱ्या काळात ही औषधे मधुमेह व हृदयरोग यांसारख्या आजारांवर गुणकारी ठरतील. तीन तरुणांनी एकत्रित येत आयुर्वेदातील सिद्ध व तत्वनिष्ठ औषधांची निर्मिती करण्याचे हाती घेतलेले काम कौतुकास्पद आहे. आयुर्वेदामध्ये सर्व व्याधींवर उपचार शक्य असून, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली, तर ते अधिक प्रभावी ठरेल.”

महेश सूर्यवंशी म्हणाले, “आयुर्वेदीय औषधांच्या माध्यमातून मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी याचा उपयोग होईल. आज चतुर्थीच्या निमित्ताने बाप्पांच्या चरणी सादर झालेल्या या औषधांमुळे रुग्णांना नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास वाटतो. बाप्पांच्या आशीर्वादाने सोहम सिद्धतत्वम आणखी चांगले काम करेल.”

शुभम मुंदडा म्हणाले, “निलेश सारडा, मनमोहन मंत्री आणि मी शुभम मुंदडा आम्ही तिघांनी एकत्रितपणे अडीच वर्षांपूर्वी सोहम सिद्धतत्वम संस्थेची सुरुवात केली. प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य सुकुमार सरदेशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत ‘सोहम’मध्ये शुद्धता आणि आयुर्वेदीय परंपरा याची सांगड घालून समाजाच्या चांगल्या आरोग्यासाठी आयुर्वेदीय उत्पादने बनवत आहोत. दगडूशेठ गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आज ही दोन उत्पादने रुग्णांना उपलब्ध करत आहोत, याचा आनंद आहे. यासह आवळा ज्यूस, आवळा कंद, गुलकंद, पेनकेअर ऑइल, हेअर ऑइल, पचनामृत ज्यूस अशा विविध उत्पादनांचा लोकांना लाभ होत आहे. सोहम सिद्धतत्वमची स्वरस व गोळ्यांच्या स्वरूपातील औषधे जगभर पोहोचवण्यासाठी, सर्वांना आरोग्यदायी आयुष्य देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”

आयुर्वेदातील प्राचीन परंपरा, वारसा याला आधुनिकतेची जोड देऊन गुणकारी औषधांची निर्मिती आम्ही करत असून, रुग्णांना याचा परिणामकारक व चांगला उपयोग होत आहे. रुग्णांना व्याधींपासून दिलासा देण्यात योगदान देता येतेय, तसेच आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसार कार्यात सहभागी होत आहोत, याचा आनंद वाटत असल्याचे निलेश सारडा यांनी नमूद केले.