Shivapur toll plaza : पुणेकरांच्या टोल मुक्तीसाठी शहरातील सामाजिक संघटना एकवटल्या

HomeपुणेBreaking News

Shivapur toll plaza : पुणेकरांच्या टोल मुक्तीसाठी शहरातील सामाजिक संघटना एकवटल्या

Ganesh Kumar Mule Apr 25, 2022 3:59 PM

Final Decision on Old Pension Scheme to be Taken in the Budget Session
Agitation of NCP Pune : राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन : दरवाढीविरोधात  मुंडन करत नोंदवला  निषेध
Agitation Against CM | मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पुण्यात उद्या आंदोलन! | शिवसेना (ठाकरे गट) करणार आंदोलन

महाराष्ट्र दिनी कात्रज चौकात टोलनाक्याविरूद्ध धरणे आंदोलन!

: पुणेकरांच्या टोल मुक्तीसाठी शहरातील सामाजिक संघटना एकवटल्या

पुणे :  पुणेकरांच्या टोल मुक्तीसाठी शहरातील सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. महाराष्ट्र दिनी १ मे ला सकाळी 10.30 वा. कात्रज चौकात टोलनाक्याविरूद्ध धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

शिवापुर टोलनाक्या विरोधात आज पुण्यातील कात्रज येथे सरहद संस्थेच्या सभागृहात पुणे शहरातील सामाजिक संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. पुणेकरांची बाजू कृती समितीने आंदोलनात वारंवार मांडली आहे. मात्र पुणेकरांचे लोकप्रतिनिधी प्रतिसाद देणार नसतील तर सामान्य जनतेसोबत हि लढाई लढावी लागेल. मात्र लोक प्रतिनिधींची टोलनाक्यांबाबतची अनास्था अकालनीय आहे. पुणे शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी MH12 च्या टोल मुक्तीसाठी संघटित व्हा अन्यथा शिवापूर टोलनाक्याचे भूत पुणेकरांच्या मानगुटीवर कायमस्वरूपी बसेल!
यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी मराठा महासंघाच्या सर्व शाखा या आंदोलनात उतरतील असे जाहीर करत हे आंदोलन जन आंदोलन म्हणून उभे करू असे जाहीर केले. तसेच *ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोशिएशनचे बाबा मामा शिंदे यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने १ मे रोजी कात्रज चौकात शिवापूर टोलनाक्या विरुद्ध पुणेकरांच्या वतीने धरणे आंदोलनाची हाक देत सर्व पक्षीय लोक प्रतिनिधी व कार्यकर्ते यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष सचिन आडेकर यांनी सर्व आमदारांच्या दारात पुणेकरांच्या टोल मुक्तीसाठी भविष्यात घंटानाद आंदोलन करण्यात येईल त्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ,असा इशारा बैठकीत दिला.

केवळ २० किलोमीटर साठी पुणेकरांना ८० किलोमीटरचा टोल भरावा लागत आहे. महामार्गाचे काम अपूर्ण असतानाही तब्बल १० वर्षे पुणेकरांकडून बेकायदा टोल वसूल केला गेला तरीही पुण्यातील लोकप्रतिनिधी थंड कसे? काहीतरी गौड बंगाल आहे असा आरोप कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केला आहे. १ मे च्या आंदोलनात सह्यांची मोहित राबवण्यात येणार असून MH12 साठी टोल मुक्तीची आग्रही मागणी करण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीकडून देण्यात आलेली आहे.तसेच पुणेकर कोल्हापूरच्या धर्तीवर हे जन आंदोलन उभे करतील असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.

यावेळी ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोशिएशनचे बाबा मामा शिंदे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, पुणे डॉक्टर असोशिएशनचे डॉ. राहुल सूर्यवंशी, मराठा सेवक समितीचे प्रमोद आरसूळ, मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष सचिन आडेकर, राष्ट्रशक्ती संघटनेचे सचिव शहाजी आरसूळ , राष्ट्रीय मानव अधिकार संघाचे नितीन दसवडकर, भारती विद्यापीठ वकील असोशिएशनचे अजय कपिले, स्वागत फौंडेशनचे योगेश मोरेडी, शिव शंभू प्रतिष्ठानचे नितीन जांभळे, माय पीपल माय कंट्री फाउंडेशनचे बाळकृष्ण भोसले, नागरी कृती समितीचे पद्माकर खडके, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ खोपडे, वंदे मातरम संघटनेचे मयूर मसुरकर, सामाजिक कार्यकर्ते शंकर कडू, मलिक सय्यद, राजेंद्र फरांदे, दशरथ गोळे, भोर कृती समितीचे समन्वयक डॉ. संजय जगताप, शुभम यादव, कुणाल शेटे आदी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीचे संयोजन सचिन कोळी यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0