महाशिवरात्रीनिमित्त खंडोबा गडावरील गुप्तलिंग दर्शनासाठी लोटले भाविक
जेजुरी: महाशिवरात्री निमित्त अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीक्षेत्र जेजुरी खंडोबा गड येथे दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महाशिवरात्रीनिमित्त खंडोबा गडावरील गुप्तलिंग दर्शनासाठी वर्षातून एकदाच खुले केले जाते.
खंडोबा हा भगवान शंकराचा अवतार असल्याने गडकोटातील शिखरावरील स्वर्गलोक लिंग मुख्य गाभाऱ्यातील लिंग म्हणजे पृथ्वीलोकी लिंग व गाभाऱ्यातील गुप्तलिंग म्हणजे पाताळलोकी लिंग असे महाशिवरात्रीच्या दिवशी त्रीलोकी शिवलिंगाचे दर्शन होते अशी आख्यायिका आहे वर्षातून एकदाच या तिन्ही लिंगाचे दर्शन महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना मिळत असल्याने हा मोठा योगायोग समजला जातो.
COMMENTS