Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी | पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सारसबागेतील सिद्धिविनायक मंदिरात होम हवन

HomeBreaking News

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी | पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सारसबागेतील सिद्धिविनायक मंदिरात होम हवन

Ganesh Kumar Mule Nov 27, 2024 9:39 PM

Baramati | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सहित निम्मे मंत्रिमंडळ २ मार्चला बारामतीत राहणार उपस्थित  
BJPs Ghar Ghar Chalo Sampark Abhiyan in pune | भाजपाच्या घर चलो संपर्क अभियानाचा पुण्यात शुभारंभ 
Home Minister Amit Shah | देवेंद्र फडणवीस व अमित शहांनी माफी मागून राजीनामा द्यावा : प्रशांत जगताप

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी | पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सारसबागेतील सिद्धिविनायक मंदिरात होम हवन

Maharashtra CM – (The Karbhari News Service) – “विधानसभा निवडणुकीत भाजपाला देदिप्यमान यश मिळवून देणारे देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी, हीच सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मनस्वी इच्छा आहे” असे प्रतिपादन पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केले. (Pune BJP)

राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती ला मतदारांनी भरभरून प्रेम दिले या मध्ये सर्वात मोठी कामगिरी ही भारतीय जनता पार्टीने केली आहे ह्या विजयाचे खरे शिल्पकार म्हणून देवेंद्रजी फडणविस यांचे नाव अग्रस्थानी आहे मागील सरकारच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पद देऊन त्यांना मानाचे स्थान दिले तसाच मनाचा मोठेपणा या वेळी शिंदे साहेब दाखवतील अशी आशा आहे असे घाटे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांची राज्यच्या मुख्यमंत्री व्हावेत या करता आज पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सारसबागेतील सिद्धिविनायक मंदिरात होम हवन तसेच महारतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कोथरुडचे आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील, कसब्याचे आमदार श्री. हेमंत रासने, प्रदेशाचे प्रवक्ते संदिप खर्डेकर, युवा मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे,शहर सरचिटणीस श्री. पुनीत जोशी, वर्षाताई तापकीर, श्री. राहुल भंडारे, श्री. महेश पुंडे, श्री. राजेंद्र शिळीमकर, श्री. सुशील मेंगडे, श्री. गणेश कळमकर, श्री. प्रमोद कोंढरे यांच्यासह माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.