Deputy Labour Officer | अखेर उप कामगार अधिकारी पदावर ८ कर्मचाऱ्यांना दिली गेली पदोन्नती!
| गेल्या तीन वर्षापासून प्रकरण होते प्रलंबित
Pune PMC News – (The Karbhari News Service) – गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेली उप कामगार अधिकारी पदाची पदोन्नती प्रक्रिया पार पडली आहे. त्यानुसार ८ कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठते नुसार पदोन्नती देण्यात आली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांनी या बाबतचे आदेश जारी केले आहेत. (M J Pradip Chandren IAS)
उप कामगार अधिकारी वर्ग ३ (S-१४) या पदासाठीची पदोन्नती प्रक्रियेची पुणे महापालिकेत प्रचंड चर्चा झाली होती. गेले तीन वर्ष हे प्रकरण प्रलंबित होते. मागील अतिरिक्त आयुक्तांच्या कालावधीत ही प्रक्रिया तशीच पडून होती. मात्र अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन यांनी यात पुढाकार घेत हे प्रकरण धसास लावले. पदोन्नती समितीची बैठक घेऊन आणि याचा अहवाल तयार करून आता प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना हातात पदोन्नती चे आदेश देखील दिले गेले आहेत. यामुळे आता कर्मचारी वर्ग समाधानी झाला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
सर्व ८ कर्मचाऱ्यांना कामगार कल्याण विभागात पदोन्नती देण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त यांनी या कर्मचाऱ्यांना १५ दिवसात संबंधित खात्यात रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.
– उप कामगार अधिकारी पदावर पदोन्नती मिळालेले हे आहेत कर्मचारी
१. आदर्श गायकवाड – अधिक्षक
२. सुरेश दिघे – उप अधिक्षक
३. पांडुरंग अडसूळ – उप अधीक्षक
४. बुगप्पा कोळी – उप अधिक्षक
५. अमित चव्हाण – टेलिफोन ऑपरेटर
६. निलप्रभा सूर्यवंशी – फार्मासिस्ट
७. माधवी पाटील – वरीष्ठ लिपीक
८. सुमेधा सुपेकर – वरीष्ठ लिपीक —-

COMMENTS