Department of Water Resources | खडकवासला पाटबंधारे विभाग २५ फेब्रुवारी पासून पुणेकरांचे पाणी कमी करणार! 

Homeadministrative

Department of Water Resources | खडकवासला पाटबंधारे विभाग २५ फेब्रुवारी पासून पुणेकरांचे पाणी कमी करणार! 

Ganesh Kumar Mule Feb 14, 2025 7:49 PM

PMC Water Budget 2024-25 | पुणे महापालिकेचे २०२४-२५ साठी २१.४८ TMC पाण्याचे अंदाजपत्रक जलसंपदा विभागाला सादर
Domestic Water Use | पाणी कोटा १६.५२ TMC करण्याची महापालिकेची पाटबंधारे कडे मागणी
Industrial water usage | औद्योगिक पाणी वापर दाखवा आणि बिल घ्या  | जलसंपदा विभागाला पुणे महापालिकेचे ‘चॅलेंज’ 

Department of Water Resources | खडकवासला पाटबंधारे विभाग २५ फेब्रुवारी पासून पुणेकरांचे पाणी कमी करणार!

| ७२६ कोटींच्या थकबाकी वरून पाटबंधारेचे महापालिकेला ब्लॅकमेलिंग!

 

Pune Irrigation – (The Karbhari News Service) – पाणी वापराच्या थकबाकी पोटी २०० कोटी अदा करण्याची नोटीस नुकतीच पुणे पाटबंधारे विभागाने (Pune Irrigation) महापालिकेला (PMC) पाठवली होती. यावर पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation – PMC)  देखील पाटबंधारे विभागाला खरमरीत पत्र लिहित औद्योगिक पाणी वापर नसताना वाढीव बिले देणे चुकीचे आहे, असे म्हटले होते. तसेच नागरिकांच्या टॅक्सच्या रकमेतून वाढीव बिलाची रक्कम देणे अन्यायकारक असल्याचे देखील महापालिकेने म्हटले होते. त्यानंतर पुन्हा पाटबंधारे विभागाने महापालिकेला ब्लॅकमेलिंग करणे सुरूच ठेवले आहे. ७२६ कोटींची थकबाकी अदा करा, अन्यथा २५ फेब्रुवारी पासून पाणी कमी करू. असा इशारा खडकवासला पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला दिला आहे. (Pune water uses)

पाणी वापराची थकबाकी देण्याबाबत पाटबंधारे विभागाने महापालिकेला नोटीस दिली होती. त्यात म्हटले होते की, पालिकेकडे एकूण ७१४ कोटींची थकबाकी आहे. यांमध्ये मंजूर पाणी आरक्षण वरील थकीत रक्कम ६१ कोटी, नियमबाह्य आणि अतिरिक्त पाणी वापर ११२ कोटी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दंडाची रक्कम ५४० कोटी, अशी एकूण ७१४ कोटींची थकबाकी आहे. तर चालू वर्षातील थकबाकी ही १७४ कोटी आहे. त्यामुळे तत्काळ २०० कोटींची थकबाकी द्यावी, असे पाटबंधारे ने म्हटले होते. (Pune PMC News)

यावर पालिकेने पाटबंधारे विभागाला सुनावले होते. महापालिकेने म्हटले होते कि, महापालिका कुठलाही औद्योगिक पाणी वापर करत नाही. तरीही २०२६-२०२४ या काळातील ९४४ कोटींची थकबाकी लावली आहे. तर  एप्रिल २००४ ते ऑक्टोबर २०२४ या काळातील थकबाकी ९६ कोटी लावली आहे. हे चुकीचे आहे, असे पालिकेने म्हटले होते.

पालिकेने म्हटले होते कि, पुणे महानगरपालिकेमध्ये २३ गावे व ११ गावे समाविष्ट झाली असून त्यांचा पाणीपुरवठा पाटबंधारे विभागामार्फत होत नसून पुणे महानगरपालिकेमार्फत केला जातो. असे असताना मात्र आजतागायत पाटबंधारे विभागामार्फत समाविष्ट गावांचा १.७५६१ TMC पाणीकोटा पुणे मनपाच्या पाणी देयकांमध्ये वाढवून मिळालेला नाही.

दरम्यान पुन्हा पाटबंधारे विभागाने महापालिकेला ब्लॅकमेलिंग करणे सुरूच ठेवले आहे. ७२६ कोटींची थकबाकी अदा करा, अन्यथा २५ फेब्रुवारी पासून पाणी कमी करू. असा इशारा खडकवासला पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला दिला आहे.

दरम्यान पाटबंधारे विभागाने नुकतेच पुणे महापालिकेला १४.६१ टीएमसी पाणी कोटा मंजूर केला आहे.