Contract Employees | मनपा व्हेईकल डेपोमधील कंत्राटी कामगार व बिगारी करणार निदर्शने

HomeपुणेBreaking News

Contract Employees | मनपा व्हेईकल डेपोमधील कंत्राटी कामगार व बिगारी करणार निदर्शने

Ganesh Kumar Mule Mar 08, 2023 1:57 PM

Lad Page Committee | कंत्राटी कामगारांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा 
PMC Contract Employees | Diwali Bonus | कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस मिळण्यासाठी लढा तीव्र करणार | कामगार युनियन चा प्रशासनाला इशारा 
Bonus | contract workers | मनपा कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदान देण्यास प्रशासन सकारात्मक | कामगार नेते सुनील शिंदे यांची माहिती

मनपा व्हेईकल डेपोमधील कंत्राटी कामगार व बिगारी करणार निदर्शने

पुणे | आपल्या विविध मागण्यासाठी मनपा व्हेईकल डेपोमधील कंत्राटी कामगार व बिगारी निदर्शने करणार आहेत. शुक्रवारी दुपारी 3 वाजता हे आंदोलन महापालिका भवन येथे होणार आहे. महापालिका कामगार संघटनेकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
कामगार संघटनेच्या निवेदनानुसार गेली अनेक वर्षे कंत्राटी कामगार व्हेईकल डेपोमध्ये ड्रायव्हर व गाड्यांवरील बिगारी म्हणून काम करत आहेत. मागील १३-१४ वर्षात अनेकवेळा कंत्राटदार बदलेले गेले मात्र कामगार व कामावर त्याचा कोणता परिणाम झालेला नव्ह्ता. मात्र आता नव्याने आलेले ठेकेदार जुन्या कामगारांना जे गेली कित्येक वर्ष निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांना काढून नवीन कामगार भरत असल्याची माहिती युनियनपर्यंत आलेली आहे. तरी  वेळीच सावध होऊन आपल्या रक्षणाकरता एकत्रित आले पाहिजे. महानगरपालिकेला ठणकावून सांगण्यासाठी पुणे महानगरपालिका कामगार युनियन निदर्शने करणार  आहे. तरी सर्व व्हेईकल डेपोमध्ये ड्रायव्हर व गाड्यांवरील बिगऱ्यांनी आंदोलनात सामील होऊन आपल्या हक्क-अधिकार मिळवण्यासाठी एकजूट दाखवूयात, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.