हात गाडीवर पेट्रोल डिझेलचे बॅरल ठेवून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन
सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीच्या (fuel price hike) निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी व रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आज हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडचे कार्यालय येथे काँग्रेस पक्षाच्या (congress party) वतीने अनोखे आंदोलन (agitation) करण्यात आले.
हात गाडीवर पेट्रोल डिझेलचे बॅरेल ठेवून गेल्या सहा महिन्यात झालेल्या इंधन वाढीची माहिती बॅनर वर लिहून मोर्चा हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन पुणे मुख्य कार्यालयाकडे पोहोचला.
या ठिकाणी केंद्र सरकारच्या विरुद्ध घोषणा देण्यात आले.यावेळी बोलताना वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की सहा महिन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव 129 डॉलर प्रति बॅरल होते. त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर शंभर रुपयापेक्षा अधिक होते. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर प्रति बॅलर 76 डॉलर ते 80 डॉलरच्या दरम्यान आहे. असे असताना सुद्धा आज पेट्रोलचा भाव 106 रुपये तर डिझेलचा भाव 94 रुपये प्रतिलिटर आहे.यामुळे सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. केंद्र सरकारने जनतेच्या हिताकरिता त्वरित पेट्रोल आणि डिझेलचे दर 70 रुपये प्रति लिटर करावे,अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण शहरभर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना माजी गृराज्यमंत्री प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे चे भाव वाढले आहे. सर्व तेल कंपन्यांकडे तेलाचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. रशियाने भारतला कच्च्या तेलाचा साठा पुरवला आहे. कच्च्या तेलाचे साठा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे भारत इंधन फ्रान्स, हॉलंड व अनेक देशांना निर्यात करीत आहे.एकीकडे इंधन निर्यात करून तेल कंपनी व सरकार मोठ्या प्रमाणावर नफा मिळवत आहे आणि दुसरीकडे कच्च्या तेलाचे भाव कमी असताना सुद्धा ग्राहकांना जास्तीच्या दराने इंधन देत आहे हे अन्याकारक आहे. काँग्रेसपक्ष नेहमी जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करत असते जर केंद्र सरकारने इंधन चे दर कमी केले नाही तर काँग्रेस पक्षातर्फे उग्र आंदोलन करण्यात येईल.
यानंतर काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशनचे मुख्य व्यवस्थापक श्री मनीष अग्रवाल यांना भेटून निवेदन दिले.
याप्रसंगी नगरसेवक रवींद्र धंगेकर अविनाश बागवे,नरुद्दीन सोमजी, रमेश अय्यर,प्रशांत सुरसे, शेखर कपोते, शाबिर खान,चेतन आगरवाल, मंजूर शेख, शिलार रतनगिरी, स्वाती शिंदे,कान्होजी जेधे, बबलू कोळी, सुनील घाडगे ,प्रदीप परदेशी, दया आडगळे,रोहित अवचिते, अंजली सोलापुरे, दिलीप थोरात ,संगीता थोरात, रॉबर्ट डेव्हिड,क्लेमेंट, लाजरस , सुनील बावकर , हुसेन शेख ,अस्लम बागवान , रामदास मारणे, सुरेश कांबळे, फैयाज शेख, विपुल उमंदे, सोनिया ओव्हाळ,सनी ओव्हाळ, मंगला चव्हाण, व असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.