MLA Ravindra Dhangekar | कसब्यातील 5 प्रभागाच्या विकासासाठी आगामी बजेट मध्ये 10 कोटींची तरतूद करण्याची मागणी   | आमदार रविंद्र धंगेकर यांनी कामाला केली सुरुवात

HomeBreaking Newsपुणे

MLA Ravindra Dhangekar | कसब्यातील 5 प्रभागाच्या विकासासाठी आगामी बजेट मध्ये 10 कोटींची तरतूद करण्याची मागणी | आमदार रविंद्र धंगेकर यांनी कामाला केली सुरुवात

Ganesh Kumar Mule Mar 07, 2023 7:06 AM

Union Budget 2023-24 | केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24ची ठळक वैशिष्ट्ये
PMRDA Budget : PMRDA च्या  2 हजार 419 कोटीच्या अंदाजपत्रकास मान्यता
Mahabudget | शाश्‍वत, गतीमान विकासाबरोबर सर्व समाजघटकांचे हित साधणारा अर्थसंकल्प | भाजपकडून अर्थसंकल्पाचे कौतुक

कसब्यातील 5 प्रभागाच्या विकासासाठी आगामी बजेट मध्ये 10 कोटींची तरतूद करण्याची मागणी

| आमदार रविंद्र धंगेकर यांनी कामाला केली सुरुवात

पुणे : नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपल्या कामाचा श्रीगणेशा केला आहे. कसब्याच्या विकासावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान कसबा मतदारसंघाच्या विकासासाठी आगामी बजेट मध्ये 10 कोटींची तरतूद करण्याची मागणी केली आहे. यामध्ये प्रभाग 16,17,18,19 आणि 29 अशा सर्व प्रभागातील विकासकामासाठी प्रत्येकी 2 कोटीची तरतूद करण्याची मागणी आमदार धंगेकर यांनी आयुक्ताकडे केली आहे.

दरम्यान आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी महापालिका अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली. यामध्ये मिळकत कर, सुरळीत पाणीपुरवठा या महत्वाच्या प्रश्नांबाबत पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांची भेट घेऊन आमदारकीच्या कामाचा श्रीगणेशा केला. पुणेकरांच्या मिळकत करात ४० टक्के सूट द्यावी, मुंबई प्रमाणेच पुण्यातही ५०० चौरसफुटांच्या खालील सदनिकांवर मिळकत कर आकारू नये, पेठांच्या भागांमध्ये समानदाबाने व सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी योग्य नियोजन करावे. अशा विविध मागण्या केल्या.

  त्यांच्यासोबत प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस वीरेंद्र किराड, प्रदेश कॉंग्रेस प्रतिनिधी रमेश अय्यर, कसबा कॉंग्रेस ब्लॉक अध्यक्ष प्रवीण करपे, प्रदेश युवक कॉंग्रेस सचिव कान्होजी जेधे, आदी उपस्थित होते. या भेटीवेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी रवींद्र धंगेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले.

याप्रसंगी रवींद्र धंगेकर म्हणाले की, संपूर्ण देशात पुण्यात मिळकत कर सर्वाधिक असून नागरिकांना मिळकत करात ४० टक्के सवलत देऊन त्यांना आधार देणे गरजेचे आहे. तसेच मुंबई प्रमाणेच पुण्यातही ५०० चौरसफुटांच्या खालील सदनिकांवर मिळकत कर आकारला जाऊ नये. त्यामुळे छोट्या सदनिका धारकांना मोठा दिलासा मिळेल. या संदर्भात विधीमंडळात मी प्रश्न उपस्थित करणार असून राज्यशासनाकडे त्याचा मी पाठपुरावा करेन. असे सांगून ते म्हणाले की, याबरोबरच पेठांच्या भागांमध्ये दाट वस्ती असून तेथे पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होतो. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने सुरळीत पाणीपुरवठा होण्याकरिता योग्य नियोजन करून आमलात आणावे अशी मागणी त्यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे केली.

या सर्व प्रश्नांकडे प्रशासन गांभीर्याने विचार करेल आणि योग्य तो निर्णय लवकर घेतला जाईल असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिले.

| गुरुवारी घेणार शपथ

दरम्यान विधिमंडळ सभागृहात विधानसभा सदस्य म्हणून आसनस्थ होण्यासाठी आधी शपथ घेणे आवश्यक असते. त्यानुसार आमदार रविंद्र धंगेकर यांना गुरुवारी शपथ दिली जाणार आहे. विधिमंडळाकडून तसे पत्र त्यांना देण्यात आले आहे.