Datta Bahirat Pune Congress | शॉक लागून झालेल्या ३ मृत तरुणांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी | कॉंग्रेस नेते दत्ता बहिरट यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी 

HomeBreaking Newsपुणे

Datta Bahirat Pune Congress | शॉक लागून झालेल्या ३ मृत तरुणांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी | कॉंग्रेस नेते दत्ता बहिरट यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी 

गणेश मुळे Jul 25, 2024 1:38 PM

MLA Siddarth Shirole | शिवाजीनगर विधानसभा : कॉंग्रेस मधील बंडखोरी भाजपच्या फायद्याची ठरू शकते का! 
Congress Candidates List | काँग्रेस कडून शिवाजीनगर साठी दत्ता बहिरट तर पुणे कॅंटॉनमेंट (SC) साठी रमेश बागवे यांना उमेदवारी
City President | Pune Congress | कॉंग्रेसचा नवा शहर अध्यक्ष कोण?

Datta Bahirat Pune Congress | शॉक लागून झालेल्या ३ मृत तरुणांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी | कॉंग्रेस नेते दत्ता बहिरट यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

 

Datta Bahirat Pune Congress – (The Karbhari News Service) – छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभा मतदार संघात पुराच्या पाण्यात विजेचा शॉक लागून 3 तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुलाची वाडी येथे घडली. डेक्कन नदीपात्रातील अंडा भुर्जीची गाडी दुसऱ्या जागी हलवत असताना शॉक लागून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत तरुणांच्या नातेवाईकांना शासकीय निकषानुसार रोख शासकीय मदत करण्यात यावी तसेच कुटुंबातील कर्ते युवक गमावले असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्यात यावी. अशी मागणी कॉंग्रेस नेते दत्ता बहिरट यांनी  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

बहिरट यांच्या निवेदनानुसार  पहाटे तीन वाजताच्या सुमारास भिडे ब्रिज परिसरातील झेड ब्रिज खालील नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला होता. हे तीन तरुण अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता गेले होते. तेव्हा त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले होते. सदर तरुणांना उपचारांती डॉक्टरांनी पाहटे पाच वाजताच्या दरम्यान मृत घोषित केले आहे.

अभिषेक अजय घाणेकर (वय वर्ष 25) आणि आकाश विनायक माने (वय वर्ष 21) राहणार पूलाची वाडी डेक्कन , शिवा जिदबहादुर परिहार (वय वर्ष १८ )नेपाळी कामगार अशी मृत तरुणांची नावे आहेत.
महावितरणाने घटनेची पुष्टी केली आहे. पोलीस, महापालिका अधिकारीही घटनास्थळी गेले होते.

मृत तरुणांच्या नातेवाईकांना शासकीय निकषानुसार रोख शासकीय मदत करण्यात यावी तसेच कुटुंबातील कर्ते युवक गमावले असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्यात यावी.

पुणे शहरात अचानक उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे नदी किनारी असलेल्या पुलाची वाडी, पाटील इस्टेट, मुळा रोड, भैय्या वाडी , खडकी, बोपोडी येथील वसाहतींमध्ये शेकडो घरांमध्ये नदीचे पाणी शिरले आणि नागरिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्व नुकसान भरपाईचे प्रशासन स्तरावरून तातडीने पंचनामे करून नागरिकांना मदत करावी. असे बहिरट यांनी म्हटले आहे.