दांडेकर पुलाचे नाव बदलणार नाही
: महापालिका प्रशासनाचा नकारात्मक अभिप्राय
पुणे : शहरातील दांडेकर पूल चौकाचे नाव बदलून ते विवेकानंद ज्ञानपीठ चौक द्यावे, अशी मागणी नगरसेवक शंकर पवार, आनंद रिठे, अनिता कदम यांनी केली होती. मात्र प्रभाग 30 मधील नगरसेवकांनी याला परवानगी न दिल्याने हे नाव देणे अडचणीचे आहे. असा अभिप्राय प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे सध्या तरी चौकाचे नाव दांडेकर पूल हेच राहणार आहे.
: प्रभाग 29 मधील नगरसेवकांचा विरोध
नाव समितीने यावर प्रशासनाचा अभिप्राय मागितला होता. प्रशासनाच्या अभिप्रायानुसार प्रभाग क्रमांक ३० ड मधील दांडेकर पुल चौकाला विवेकानंद ज्ञानपीठ चौक असे नाव देणे बाबत पत्रा अन्वये मागणी करण्यात आली होती. प्रभागामधील एकुण चार सभासदांपैकी मा. सभासद शंकर गणपत पवार यांनी सूचक व सभासद आनंद रिठे, सभासद अनिता कदम यांनी अनुमोदक म्हणून संदर्भाकित पत्रासोबत जोडलेल्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. या विभागाकडील उपलब्ध कागदपत्रांनुसार प्रस्तावातील सुचविलेल्या चौकास यापूर्वी मान्य नाव नाही. प्रस्तावातील सुचविलेल्या चौक हा प्रभाग क्रमांक ३० व प्रभाग क्रमांक २९ अशा दोन प्रभागाच्या हद्दीवर येत असून प्रभाग ३० मधील एक व प्रभाग क्रमांक २९ मधील तीन अशा एकुण चार उर्वरीत सभासदांच्या सम्मती बाबत स्वक्षारी नसल्याने सुचविलेल्या चौकाला विवेकानंद ज्ञानपीठ चौक असे नाव देणे अडचणीचे आहे. त्यामुळे सध्या तरी चौकाचे नाव दांडेकर पूल हेच राहणार आहे. समितीने या अभिप्रायास मंजुरी दिली आहे.
COMMENTS