DA Hike News | केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली | गेल्या ७ वर्षातील सर्वात कमी महागाई भत्ता जाहीर
DA Hike Latest News – (The Karbhari News Service) – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ (DA Hike) जाहीर करण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, सरकारी कर्मचाऱ्यांना आता ५३ टक्क्यांवरून ५५ टक्के महागाई भत्ता मिळेल. दरम्यान गेल्या ७ वर्षातील हा सर्वात कमी महागाई भत्ता आहे. या आधी भत्ता हा ४ किंवा ५ टक्क्यांनी वाढत होता. (Dearness Allowance Hike)
महागाई भत्ता २ टक्क्यांनी वाढला
वैष्णव म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (डीए) आणि महागाई मदत (डीआर) मध्ये २% वाढ करण्यास मान्यता दिली आहे. ही वाढ १ जानेवारी २०२५ पासून लागू होईल आणि आता एकूण महागाई भत्ता ५३% वरून ५५% पर्यंत वाढेल.”
६६ लाख पेन्शनधारकांना लाभ मिळेल
या निर्णयाचा फायदा सुमारे ४८.६६ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६६.५५ लाख पेन्शनधारकांना होईल. यामुळे सरकारवर दरवर्षी ६६१४.०४ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार करण्यात आली आहे.
COMMENTS