New Bill : आताची प्रभाग रचना रद्द!  : निवडणुका 5-6 महिने पुढे जाणार? : महापालिकेला अजून सूचना नाहीत 

HomeBreaking NewsPolitical

New Bill : आताची प्रभाग रचना रद्द!  : निवडणुका 5-6 महिने पुढे जाणार? : महापालिकेला अजून सूचना नाहीत 

Ganesh Kumar Mule Mar 07, 2022 12:09 PM

Holiday on 2 December | नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Local body Elections | पालिका निवडणुकांमध्ये मतदान केंद्रावर कर्मचारी नियुक्त करण्याबाबत निवडणूक आयोगाचे नवीन आदेश | जाणून घ्या सविस्तर
Raj Thackeray : पालिका निवडणुका पुढे का ढकलल्या.. : राज ठाकरेंनी सांगितले कारण 

आताची प्रभाग रचना रद्द!

: निवडणुका 5-6 महिने पुढे जाणार?

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील (Local body) मतदारसंघांची रचना तयार करण्याचे अधिकार आणि निवडणुकांचे वेळापत्रक ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारडे (State Government) देणारे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत आज मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका पाच ते सहा महिने पुढे जाणार आहेत. असे सांगण्यात येत आहे.

मागील काही महिन्यांपासून राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा पेच निर्माण झाला आहे. ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विधेयकानुसार संपूर्ण प्रभाग रचना रद्द झाली आहे. आता नव्याने सरकार प्रभाग रचना तयार करेल. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हे विधेयक मांडले.

 

ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळत नाही तो पर्यंत निवडणुका नको, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली होती. निवडणूक आयोग सध्या त्यांच्याकडे असलेल्या अधिकाऱामुळे निवडणूक जाहीर करू शकतो. त्यात बदल करून निवडणुकांच्या तारखा ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारला मिळावे यासाठी हे विधेयक मांडण्यात आले आहे.

भुजबळ म्हणाले, प्रभागरचना आणि आरक्षण यांची माहिती आता शासन गोळा करेल तसेच शासन ही माहिती गोळा करून निवडणूक आयोगाकडे देईल. मग ते निर्णय घेतील. प्रभाग रचनेवर स्थगिती आणली गेली आहे, अशी महत्वाची घोषणा त्यांनी केली.

: महापालिकेला अजून सूचना नाहीत

दरम्यान पुणे महापालिकेला याबाबत अजूनही कुठली अधिकृत सूचना राज्य सरकार कडून आलेली नाही. असे निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले. महापालिकेला प्रभाग रचनेचा अहवाल सादर करण्यासाठी ८ मार्च ची मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिका हे काम करत आहे. असे ही निवडणूक विभागाने सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0