बाणेरच्या सोसायटीमध्ये रंगली क्रिकेट स्पर्धा
पुणे : बाणेर-बालेवाडी-सूस-म्हाळुंगे भागातील सोसायट्यांमधील नागरिकांसाठी बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशनच्या वतीने बी बी एस एम सोसायटी फुल्ल पीच डे- नाईट क्रिकेट स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये ७० पुरुष व ५ महिला सोसयटी मधील संघांनी सहभाग घेतला. एकुण ७७० पुरुष व ५५ महिला खेळाडु सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते मा. महापौर अंकुश काकडे व शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या क्रिकेट स्पर्धेमुळे सोसायटी वर्गातील नागरिक व खेळाडू यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले; कारण अशी भव्य क्रिकेट स्पर्धा या पूर्वी कोणी भरवली नाही. त्यामुळे अश्या स्पर्धेचे आयोजन नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी दरवर्षी करावे. अशी मागणी सोसायटी मधील नागरिकांनी व खेळाडूंनी केली असता चांदेरे यांनी ही स्पर्धा तुमच्या साठी दरवर्षी भरवली जाईल. असे आश्वासन त्यांनी देताच खेळाडू आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
तसेच अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे बाणेर येथे नव्याने स्मारक उभारण्यात आले या स्मारकाचे अनावरण सोहळा संपन्न झाला , यावेळी स्वराज्य प्रतिष्ठान यांना बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनच्या वतीने ५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
याप्रसंगी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा कविता आल्हाट, नगरसेवक प्रमोद निम्हण, नगरसेविका रोहिणी चिमटे, शिला भालेराव, डॉ. सागर बालवडकर , मनोज बालवडकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक वर्ग आणि क्रिकेट प्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रिकेट स्पर्धेचे आयोजन समीर बाबुराव चांदेरे, पुनम विशाल विधाते व कोथरूड विधानसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष नितीन कळमकर यांनी केले आहे .
COMMENTS