१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे शाळांमध्ये जाऊन कोविड १९ लसीकरण
: महापालिका प्रशासनाची मोहीम
पुणे : १२ ते १४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे मोफत लसीकरण करणेसाठी मुख्य लसीकरण कार्यालय आरोग्य विभाग पुणे मनपा मार्फत खासगी /मनपा शाळांमध्ये व्हॅक्सीन ऑन व्हील्स या उपक्रमांतर्गत नियोजन करणेत आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार मुख्य लसीकरण कार्यालय आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका १६ मार्च २०२२ पासून संपूर्ण पुणे शहरामध्ये १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या कोविड-१९ लसीकरणाला सुरुवात करणेत आली आहे. केंद्र शासनाच्या निर्गमित केलेल्या आदेशानुसार तसेच राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना कोविड -१९ लसीकरण सुरु करावे व त्यांच्या लसीकरणासाठी कॉर्बेव्हॅक्स लस दिणेबाबत आदेश प्राप्त झाले आहेत. त्या प्रमाणे लसीकरण मोहीम सुरु झाल्यापासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील २६% लाभार्थ्यांचा पहिला डोस व १४% लाभार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. त्याअनुषंगाने १२ ते १४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे मोफत लसीकरण करणेसाठी मुख्य लसीकरण कार्यालय आरोग्य विभाग पुणे मनपा मार्फत खासगी /मनपा शाळांमध्ये व्हॅक्सीन ऑन व्हील्स या उपक्रमांतर्गत नियोजन करणेत आले आहे.
महाराष्ट्र शासनाचे प्राप्त मार्गदर्शक सूचनेवरून १२ ते १४ वयोगटातील लाभार्थ्यासाठी पात्रता खालीलप्रमाणे आहे.
१. सन २००८.२००९ तसेच दि. १५ मार्च २०१० वा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले लाभार्थी हे पात्र राहतील
२. २४/०६/२०२२ रोजी पासून अंदाजे ७६ शाळांमध्ये ११,८०० विद्यार्थ्यांना लसीकरण करणेबाबत प्रयोजन करणेत आले आहे.
३. लसीकरणाच्या वेळी लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थ्याकडे आधारकार्ड / ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
२. २४/०६/२०२२ रोजी पासून अंदाजे ७६ शाळांमध्ये ११,८०० विद्यार्थ्यांना लसीकरण करणेबाबत प्रयोजन करणेत आले आहे.
३. लसीकरणाच्या वेळी लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थ्याकडे आधारकार्ड / ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
तरी पुणे शहरातील ज्या पालकांची मुले १२ ते १४ वयोगटात आहेत त्या पालकांनी आपल्या मुलांचे लसीकरण शाळेमध्ये करून घ्यावे असे आवाहन पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.