बाबूराव चांदेरेंच्या भावनेचा विचार करून राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी द्यावी
: अमोल बालवडकर यांची प्रतिक्रिया
पुणे : बाणेर बालेवाडी परिसरात भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील कलगीतुरा नेहमीच पाहायला मिळतो. महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्याने निवडणुकीला वेग आला आहे. त्यामुळे सगळे कंबर कसून कामाला लागले आहेत. अशातच औंध बालेवाडी प्रभागावर sc चे आरक्षण पडले आहे. राष्ट्रवादीकडून बाबूराव चांदेरे यांनी उमेदवारी मागितली आहे. यावर भाजपचे अमोल बालवडकर यांनी उपहासात्मक टीका केली आहे. बालवडकर यांनी राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष्याना विनंती केली आहे कि, चांदेरे यांच्या भावनेचा आदर करून त्यांना प्रभागातून उमेदवारी द्यावी.
बालवडकर म्हणाले, आधी बाणेर – बालेवाडी प्रभाग स्वतःच्या राजकिय सुरक्षिततेसाठी चुकिच्या पद्धतीने तोडायचा ! परत वर म्हणायचं ‘ मी बालेवाडी -औंध प्रभागातुन इच्छुक आहे. वाह !
एव्हढा कॅान्फिडन्स आणता तरी कुठुन? माझी शहर अध्यक्ष प्रशांतजी जगताप यांना विनंती आहे कि आपण माजी नगरसेवक चांदेरे यांच्या भावनेचा विचार करावा व त्यांना बालेवाडी – औंध मधुन उमेदवारीवर द्यावी.
यावर चांदेरे काय प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आगामी पुणे महानगरपालिका निवडणूकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. याच अनुषंगाने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि बाबुराव चांदेरे साहेबांच्या उपस्थिती मध्ये प्रभाग क्रमांक १२ औंध-बाणेर-बालेवाडी प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची बैठक पार पडली. यावेळी प्रभाग क्रमांक १२ मधून माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी देखील आपण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे भावना शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांना बोलून दाखवली.
COMMENTS