महंगाई पे हल्ला बोल काँग्रेसची दिल्लीत रविवारी महारॅली
| महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार
– माजी आमदार मोहन जोशी
पुणे : मोदी सरकारची दिशाहीन आर्थिक नीती आणि महागाई याचा निषेध नोंदविण्यासाठी काँग्रेस पक्ष दिल्लीत रविवार दि.4 सप्टेंबर रोजी रामलीला मैदानावर महा रॅली काढनार असून महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते दिल्लीला रवाना झाले आहेत,अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष,माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली आहे.
सध्याच्या कठीण काळात काँग्रेस पक्ष जनते बरोबर आहे आणि राहील.मोदी सरकारची धोरणे विनाशकारी आहेत. गेल्या आठ वर्षांत अशा चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. घरगुती गॅस सिलिंडर, तेल, कडधान्ये यांचे भाव वाढलेले आहेत. सध्या सण चालू असून महागाईच्या झळा सोसत सण साजरे केले जात आहेत. या बिकट परिस्थितीच्या विरोधात २०२१ च्या जून महिन्यापासून काँग्रेस पक्षाने देशभरात संसदेपासून अगदी रस्त्यावर आंदोलने करून जनतेचे गाऱ्हाणे मांडून मोदी सरकारचा निषेध नोंदविला आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून दिल्लीत महा रॅली आयोजित केली आहे.भारतभर चाललेल्या आंदोलनात महाराष्ट्रातील काँग्रेस सातत्याने सहभागी झाली आहे,असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हंटले आहे.
दिल्लीतील महा रॅली मध्ये महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते दिल्लीला जात असून पुण्यातील काँग्रेस कार्यकर्तेही त्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत, पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रखर आंदोलने करुन यापूर्वी सातत्याने निषेध नोंदविला आहे, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली आहे.