महागाई लादणाऱ्या मोदी सरकारने राजीनामा द्यावा
– महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी
: काँग्रेसने उभारली महागाईची गुढी.
पुणे : सध्याच्या महागाईला कारणीभूत असलेल्या मोदी सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या महागाईविरोधी आंदोलनात बोलताना केली.
जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी अलका टॉकीजजवळील टिळक चौकात निदर्शने करण्यात आली. चौकात महागाईची गुढी उभारून निषेध नोंदविण्यात आला. यामध्ये आमदार संग्राम थोपटे, पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, देवीदास भन्साळी, अभय छाजेड, आबा बागुल, संजय बालगुडे, दीप्ती चवधरी, वीरेंद्र किराड, लता राजगुरू, रविंद्र धंगेकर, अरविंद शिंदे, अजित दरेकर, कमल व्यवहारे, दत्ता बहिरट, गोपाळ तिवारी, रमेश अय्यर, चंद्रशेखर कपोते, महिला काँग्रेस अध्यक्षा पूजा आनंद, युवक अध्यक्ष राहुल शिरसाट, सोनाली मारणे, प्रशांत सुरसे, स्वाती शिंदे आदी सहभागी झाले होते.
महागाईच्या विरोधात २०१४ सालापूर्वी आंदोलन करणारे भाजपचे नेते आता कुठे लपले आहेत? असा सवाल थोरात यांनी केला आणि या नेत्यांना जनता जाब विचारल्याशिवाय राहाणार नाही, असे थोरात यांनी सांगितले. जनतेच्या मनात महागाईबद्दल असंतोष असून त्याचा कधीही उद्रेक होईल, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला.
जनतेला अच्छे दिनचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते परंतु २०१४ पासून सातत्याने पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत चालले आहे. या विषयावर पंतप्रधान भाष्य करीत नाहीत. भाववाढमुळे सर्वसामान्य जनतेला जगणे कठिण झाले आहे. सणासुदीच्या काळात भाववाढ करून मोदी सरकारने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यात मोदी सरकार अपयशी ठरले असे पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
महाराष्ट्रात उद्या गुढीपाडव्याचा सण साजरा होईल. या सणाला गोड पदार्थ करून नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. पण सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत चालले आहेत, सणाचा आनंद राहिला नाही. केंद्रातील मोदी सरकार भाववाढ रोखण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली.
यावेळी सुजीत यादव, विनोद रणपिसे, शिलार रतनगिरी, वाल्मीक जगताप, किरण मात्रे, अविनाश अडसूळ, बाळासाहेब अमराळे, राहुल वंजारी, शानी नौशाद, राकेश नाणेकर, नरेंद्र व्यवहारे, शोभना पण्णीकर, प्रकाश पवार, शिवा मंत्री, छाया जाधव, संगीता पवार, रजनी त्रिभुवन, अनुसया गायकवाड, ज्योती परदेशी, सतिश पवार, राजेंद्र भुतडा, प्रविण करपे, प्रदिप परदेशी, रमेश सोनकांबळे, अजित जाधव, गौरव बोराडे, विठ्ठल गायकवाड, सुरेश कांबळे, कान्होजी जेधे, मेहबुब नदाफ, शाबीर खान, आयुब पठाण, चेतन आगरवाल, दिपक ओव्हाळ, इंद्रजीत भालेराव, सुंदरा ओव्हाळ, सीमा महाडिक, ताई कसबे, जावेद निलगर, सुनिता नेमुर, जयश्री कांबळे, अण्णा राऊत यासंह असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
COMMENTS