Congress on Caste Wise Census | राहुल गांधी यांनाच जातीनिहाय जनगणनेचे श्रेय | माजी आमदार मोहन जोशी

HomeBreaking News

Congress on Caste Wise Census | राहुल गांधी यांनाच जातीनिहाय जनगणनेचे श्रेय | माजी आमदार मोहन जोशी

Ganesh Kumar Mule May 02, 2025 12:21 PM

Photos | Congress Bhavan | ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला सजवण्यात आलेली कॉंग्रेस भवन ही देखणी इमारत | फोटो पहा 
Pune Congress Agitation | भाजप प्रेरित मनुस्मृतीचे राज्य कधीही काँग्रेस येऊ देणार नाही – अरविंद शिंदे
Bharat Jodo Yatra | भारत जोडो यात्रेसाठी पुण्यातील शक्ती स्थळांवरून मातीचे संकलन |पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपक्रम

Congress on Caste Wise Census | राहुल गांधी यांनाच जातीनिहाय जनगणनेचे श्रेय | माजी आमदार मोहन जोशी

| राहुल गांधीच्या मागणीचा विजय पेढे वाटून जल्लोषात साजरा

 

Pune Congress – (The Karbhari News Service) – जातीनिहाय जनगणनेचा (Caste Wise Census) निर्णय केंद्राने घेतला असला तरी त्याचे श्रेय काँग्रेस पक्षाचे (INC) नेते  राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनाच आहे, असे प्रतिपादन माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress) यांनी केले. (Rahul Gandhi)

जातीनिहाय जनगणनेचा निर्णय हा आदरणीय राहुलजींचा विजय आहे. महात्मा फुले वाडा येथे मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी तो विजय जल्लोषात साजरा केला. पेढे वाटण्यात आले, महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. ‘झुकता है मोदी, झुकानेवाला राहुल गांधी चाहिये’, ‘सामाजिक न्यायक्रांतीचे नवे जननायक राहुल गांधी’ अशा घोषणांचे फलक हाती घेऊन ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी या घोषणा दिल्या. प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रशांत सुरसे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

जातीनिहाय जनगणना व्हावी, याकरिता गेली १० वर्षे आदरणीय राहुलजी संसदेत तसेच वेगवेगळ्या व्यासपीठांवर मागणी करत होते. भाजपच्या नेत्यांनी वेळोवेळी या मागणीची अवहेलना केली. खालच्या पातळीवर जाऊन आदरणीय राहुलजींवर टीका केली. पण, अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला आदरणीय राहुल गांधी यांच्यापुढे झुकावे लागले. सर्वसामान्य जनतेची बाजू आदरणीय राहुलजींनी नेहमीच घेतली आहे आणि ते पुढेही घेतील, असे मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या वेळी अविनाश बागवे, सुनिल मलके, प्रशांत सुरसे, ॲड.शाबीर खान, चेतन आगरवाल, रामदास मारणे, सुरेश कांबळे, प्रथमेश आबनावे, आयुब पठाण, स्वाती शिंदे, अनिता मकवाना, भावना बोराटे, पल्लवी सुरसे, हसीना आपा सय्यद, सादिक लुकडे, रवी पाटोळे, चंद्रकांत चव्हाण, प्रशांत वेलणकर, बाळासाहेब तथा नानासाहेब मारणे,अनिल आहिर,ओंकार मोरे, ॲड.विजय तिकोणे, विनायक तामकर, रफीक आलमेल, अक्षय नवगिरे, साहिल राऊत, प्रसन्न मोरे, राजेश पवार,गणेश साळुंखे,विजय साबळे, संदीप कुदळे, बाळासाहेब बहुले, अशपाक शेख,शकील ताजमत, सोनू शेख, हुसेन शेख, सुभाष जाधव, विकास माने,राजेश पवार,योगेश मंगळेकर,अभिजीत लडकत आदी सहभागी झाले होते.