Congress Candidates List | काँग्रेस कडून शिवाजीनगर साठी दत्ता बहिरट तर पुणे कॅंटॉनमेंट (SC) साठी रमेश बागवे यांना उमेदवारी

HomeBreaking News

Congress Candidates List | काँग्रेस कडून शिवाजीनगर साठी दत्ता बहिरट तर पुणे कॅंटॉनमेंट (SC) साठी रमेश बागवे यांना उमेदवारी

Ganesh Kumar Mule Oct 27, 2024 9:39 PM

Congress Digital Member Registration : कॉंग्रेस पक्षाच्या डिजिटल सभासद नोंदणीला प्रतिसाद : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ३० तारखेला पुण्यात घेणार आढावा
Drivers | कंत्राटी चालकाला कामावरुन कमी करणार नाही
Women’s Day : महिला दिनानिमित्त गुणवंत महिलांचा सन्मान  : योगिता सुराणा, भरत सुराणा यांचा उपक्रम 

Congress Candidates List | काँग्रेस कडून शिवाजीनगर साठी दत्ता बहिरट तर पुणे कॅंटॉनमेंट (SC) साठी रमेश बागवे यांना उमेदवारी

Pune News – (The Karbhari News Service) – काँग्रेसने अखेर पुण्यातील दोन जागांवरील तिढा सोडवला आहे. प्रदेश काँग्रेस कडून शिवाजीनगर साठी दत्ता बहिरट तर पुणे कॅंटॉनमेंट साठी रमेश बागवे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. (Pune News)

भाजप कडून शिवाजीनगर साठी आमदार सिद्धार्थ शिरोळे तर पुणे कॅंटॉनमेंट साठी आमदार सुनील कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. तर आता या दोन्ही मतदार संघासाठी काँग्रेस कडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार ही लढाई काँग्रेस आणि भाजप यांच्यात होणार हे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसने शहरातील एकूण ८ मतदार संघापैकी ३ जागा आपल्याकडे घेतल्या आहेत. यात सगळी लढाई ही काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच आहे. कसबा पेठ मतदार संघातून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात लढत होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0