मराठा क्रांती मोर्चा व मराठा विद्यार्थ्याकडून सरकारचे अभिनंदन
सारथी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या मुख्य कार्यालयाजवळ मराठा क्रांती मोर्चा पुणे व मराठा समाजातील विद्यार्थी यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले.
मुंबई येथील सह्याद्री अतिगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. यामध्ये सार्थीच्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन डेट प्रमाणे शिष्यवृत्ती देण्याचे मान्य करण्यात आले. या बैठकीस महाराष्ट्राचे मंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह उपसमितीचे सर्व मंत्रिमंडळातील सहकारी यांची मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयकांसमवेत बैठक पार पडली. यावेळी 2019 ते 2022 यामधील शिष्यवृत्ती मिळवणारे विद्यार्थी यांना रजिस्ट्रेशन डेट पासून शिष्यवृत्ती देण्याचे मान्य करण्यात आले. त्याचप्रमाणे येथून पुढे सर्वांना रजिस्ट्रेशन डेट पासून शिष्यवृत्ती देण्याचे मान्य करण्यात आले.
गेले पाच वर्ष यासंदर्भात विद्यार्थ्यांनी सारथी संस्थे समोर अनेक वेळा आंदोलने केली. मराठा क्रांती मोर्चा व विद्यार्थ्यांची मागणी होती.
यावेळी सचिन आडेकर समन्वय मराठा क्रांती मोर्चा पुणे शहर, अजय पाटील उपाध्यक्ष मराठा महासंघ, अनिल ताडगे , सचिन दरेकर, महेश पवार, राकेश भिलारे , देवीदास लोणकर , योगिता पडवळ , अनुपमा जगताप, प्रियांका सुंबे , सोनाली म्हस्के , सुशील जामकर , विकास इक्कर , अंबादास मेव्हणकर , उमेश खंदारे , अंकिता पवार उपस्थित होते.
—-
मी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या सह उपसमितीतील सर्व मंत्र्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो. गेली ५ वर्षे आम्ही सातत्याने हि मागणी करीत होतो आता या निर्णयामुळे मराठा समाजातील शेकडो विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.
सचिन आडेकर, समन्वयक मराठा क्रांती मोर्चा पुणे शहर