City Engineer PMC | अनिरुद्ध पावसकर यांना शहर अभियंता पदावर पदोन्नती! | शहर सुधारणा समिती आणि मुख्य सभेची मान्यता 

Homeadministrative

City Engineer PMC | अनिरुद्ध पावसकर यांना शहर अभियंता पदावर पदोन्नती! | शहर सुधारणा समिती आणि मुख्य सभेची मान्यता 

Ganesh Kumar Mule Dec 08, 2025 11:52 AM

PMRDA Draft DP | प्रारूप विकास आराखड्या बाबत पीएमआरडीएच्या आठ याचिका निकाली | उज्वल केसकर यांच्या याचिकावर २५ ऑगस्ट ला सुनावणी 
Tata Group Vs Shrinivas Kandul | टाटा ग्रुप कडून श्रीनिवास कंदूल यांना केले जातेय ‘टार्गेट’ | महापालिका आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष
Property Tax | 40% कर सवलतीबाबत उद्या मुख्यमंत्री घेणार बैठक | PMPML च्या काही विषयांवर देखील होणार चर्चा

City Engineer PMC | अनिरुद्ध पावसकर यांना शहर अभियंता पदावर पदोन्नती! | शहर सुधारणा समिती आणि मुख्य सभेची मान्यता

 

PMC City Engineer – (The Karbhari News Service) – शहर अभियंता प्रशांत वाघमारे (City Engineer Prashant Waghmare)  हे ३१ जानेवारी २०२६ ला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे हे पद रिक्त राहणार आहे. त्यामुळे हे पद पदोन्नती ने भरण्या बाबत प्रक्रिया करण्यात आली. पदोन्नती समितीने मुख्य अभियंता तथा पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar PMC) यांची शहर अभियंता पदासाठी शिफारस केली. त्यानुसार हा प्रस्ताव शहर सुधारणा समितीच्या माध्यमातून मुख्य सभेसमोर ठेवण्यात आला होता. त्यानुसार सभेने मान्यता दिली आहे. (PMC Officers Promotion)

| प्रशांत वाघमारे होत आहेत सेवानिवृत्त

सध्या शहर अभियंता या पदावर कार्यरत असलेले अधिकारी प्रशांत वाघमारे हे ३१ जानेवारी २०२६ अखेर वयोपरत्वे सेवानिवृत्त होत आहेत.  जागा रिक्त होत असल्याने महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ मधील कलम ४५ (१) नुसार नेमणूक करणे व कलम ४५ (५) अन्वये जागा रिकामी झाल्यास ते पद चार महिन्यात नेमणूक करणेबाबतची तरतूद असल्याबाबत  पदोन्नती समितीने अवलोकन केले.

| दोन अधिकारी ठरत होते पात्र

दरम्यान शहर अभियंता (वेतनश्रेणी | एस – २७) पदावर पदोन्नती साठी दोन अधिकारी पात्र ठरत होते. यामध्ये मुख्य अभियंता तथा पाणीपुरवठा विभाग प्रमुख नंदकिशोर जगताप (बी ई) आणि मुख्य अभियंता तथा पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर (एम ई)  यांचा समावेश होता. सेवा ज्येष्ठते नुसार यादीत पहिले नाव हे जगताप यांचे होते.

| पदोन्नती समितीने एक मताने केली शिफारस

दरम्यान दोन्ही अधिकारी  पात्रतेचे निकष पूर्ण करित असले तरी पुणे महानगरपालिका सेवा (सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ मधील परिशिष्ट २ मधील अ. क्र. १३३ मध्ये शहर अभियंता या पदाचे पात्रतेमध्ये पदव्युतर पदवी धारकास प्राधान्य असे नमूद असल्या कारणाने वरनमूद पदोन्नतीसाठी विचाराधीन कक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांपैकी ज्यांच्या कडे पदव्युतर पदवी आहे व जरी ते सेवाकनिष्ठ असले तरी त्यांना प्राधान्याने पदोन्नती देण्यात यावी. तसेच शहर अभियंता हे पद महत्त्वाचे असल्यामुळे पदव्युतर पदवी असल्याने त्यांच्या ज्ञानाचा उपयोग शहर अभियंता या पदाला न्याय देणे योग्य होईल असे  पदोन्नती समितीने एक मताने शिफारस केली. त्यामुळे निवड यादीत अनिरुद्ध पावसकर यांना प्राधान्य देण्यात आले.

| एकाच दिवशी सर्व प्रक्रिया

दरम्यान शहर अभियंता पदाच्या पदोन्नती साठी पदोन्नती समितीची बैठक ५ डिसेंबर ला दुपारी ३ वाजता झाली. त्यानंतर त्याच दिवशी ४ वाजता तत्काळ हा प्रस्ताव शहर सुधारणा समिती मध्ये दाखल करण्यात आला. तिथे लगेच तो दाखल मान्य देखील झाला. त्याच दिवशी मुख्य सभेत हा प्रस्ताव आणण्यात आला. तो तिथे देखील मान्य झाला. इतर कर्मचाऱ्यांना आपल्या पदोन्नती साठी वर्षानुवर्ष रखडावे लागते. पदोन्नती समितीच्या बैठका वारंवार पुढे ढकलल्या जातात. या पदासाठी मात्र तत्काळ प्रक्रिया केली गेली. असाच न्याय आमच्या पदोन्नती साठी देण्यात यावा, अशी मागणी महापालिका कर्मचारी करत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: