सौंदरे गावच्या नागरिकांनी सोलापूर महामार्ग रोखला
: वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
बार्शी : महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात सौंदरे गावचे शेतकरी उस्फुर्तपणे रस्त्यावर उतरले आहेत. वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी करत बार्शी – सोलापूर महामार्ग रोखला. सरकार अजूनही भानावर येणार नसेल तर आंदोलन आणखी तीव्र करावे लागेल. असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पत्र लिहीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
: आमदार राऊत यांचा सरकारला इशारा
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज खंडीत केली असून तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी व कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यात महावितरणने शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. याचाच परिणाम म्हणून महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात सौंदरे गावचे शेतकरी उस्फुर्तपणे रस्त्यावर उतरले आहेत. वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी करत बार्शी – सोलापूर महामार्ग रोखला. सरकार अजूनही भानावर येणार नसेल तर आंदोलन आणखी तीव्र करावे लागेल. असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पत्र लिहीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, शेतकऱ्यांचे वीज बील माफ करुन वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा. अन्यथा बार्शी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसमवेत रास्ता रोको आंदोलन व मोर्चा काढण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. तरी शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत होणेकामी संबंधीतांना आदेश व्हावेत. असे ही राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.
COMMENTS