पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे आवाहन
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण परिसरात गेल्या तीन दिवसांत जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणातून येणाऱ्या पाण्यामध्ये गढुळपणा वाढला आहे. महापालिकेकडून सदरचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध करण्यात येत असून पिण्यासाठी पूर्णपणे योग्य आहे. तरी नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.