Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti | मराठा सेवा संघाकडून स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti | स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या ३६६ व्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शिवश्री राजेंद्र कुंजीर, आमदार रविंद्र धंगेकर, मराठा महासंघाचे अनिल ताडगे व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. (Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti)
यावेळी बोलताना आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले,’ छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर होतेच परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी घालून दिलेला आदर्श त्यांनी बलिदाना पर्यंत पाळला. तत्कालीन विशिष्ट समाजाने संभाजी महाराजांना छत्रपती होण्यासाठी आडकाठी केली तोच समाज आज बहुजनांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले इच्छित साध्य करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजां प्रमाणेच छत्रपती संभाजी महाराज हे युगपुरुष होते त्यांचा आपण आर्दश घेतला पाहिजे. वयाच्या १२ व्या वर्षी संस्कृत मधून बुधभूषण ग्रंथ लिहिणारे छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक म्हणूनच ओळखले गेले पाहिजेत.
यावेळी आबा जगताप, अनंत घरत , चैतन्य नाणेकर, अन्वर शेख , राकेश भिलारे, पै. गणेश सपकाळ यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.