Rain : IMD : राज्यात आगामी 3 दिवसात जोरदार पावसाची शक्यता!  : हवामान खात्याचा इशारा

HomeBreaking Newsपुणे

Rain : IMD : राज्यात आगामी 3 दिवसात जोरदार पावसाची शक्यता!  : हवामान खात्याचा इशारा

Ganesh Kumar Mule Nov 06, 2021 4:20 PM

Monsoon 2023 | आनंदाची बातमी | मान्सून संपूर्ण राज्यात दाखल | हवामान विभागाची घोषणा 
Monsoon Update | हवामान विभागाचा अंदाज | येत्या ४,५ दिवसांत महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता
Pune Rain | भारतीय हवामान खात्याकडून पुणे आणि सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रशासनाला युद्धपातळीवर सतर्क राहण्याचे आदेश

पुणे : दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लक्ष्यद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने संपूर्ण दक्षिण भारतात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. हवेच्या कमी दाबाचं हे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच लक्षद्विप (Lakshadweep) आणि कर्नाटक किनारपट्टी (Karnataka coast) परिसरात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाची (Maharashtra Rains) स्थिती झाली आहे. महाराष्ट्रात पुढील तीन दिवस कडकडाटासह जोरादर पावसाचा (Maharashtra Rains) इशारा हवामान खात्याने (IMD) दिला आहे.

राज्यात ठिकठिकाणी पडला पाऊस

आज सकाळपासून मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, घाट परिसर, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.

येत्या काही तासांत संबंदित जिल्ह्यात मुसळधार पावसाची (torrential rain) हजेरी लागण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (दि.5) सायंकाळी राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. राज्यातील सांगली, सातारा, रत्नागिरी, पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक या जिल्ह्यात पावसाने हजेरी (Maharashtra Rains) लावली आहे. नाशिक शहराला (Nashik city) काल मुसळधार पावसानं झोडपलं आहे. काल मध्यरात्रीर्पयंत शहरामध्ये 31.8 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

तर मान्सून हंगाम संपल्यानंतर शहरात तब्बल 71.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय किमान तापमानात 3 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.
आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) देण्यात आला आहे.
पुढील काही तासात याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. उद्यापासून म्हणजेच रविवार (दि.7) पासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे.

रविवारी राज्यातील कोल्हापूर रत्नागिरी, सातारा आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय रविवारी पुणे रायगड, सांगली, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची (Maharashtra Rains) शक्यता आहे.

COMMENTS

WORDPRESS: 1
  • comment-avatar

    चेन्नई येथे झालेल्या बिगरमोसमी पावसाने सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे..,.
    सरकारचा खेळ अतबट्ट्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी बिगरमोसमी पाऊस कोसळण्या अगोदरच सावध राहणे आवश्यक आहे.
    दक्षता म्हणून सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घेणे खूप आवश्‍यक आहे करण बिगरमोसमी पाऊस चालू आहे तो आपल्या हाता तोंडाला आलेल्या पिकाच्या संदर्भामध्ये नुकसानकारक ठरू शकतो म्हणून शेतकऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, मंजे कापूस, सोयाबीन, मका, बाजरी, पिक काढून पावसाने भिजनार नाही ह्याबाबत जितके शक्य तितक्या तितक्या उपयोजना करून आपापले शेतातील शेतमाल वाचवणे आवश्यक आहे . दै कारभारी वतन न्यूज हे सातत्याने शेतकऱ्यांच्या विषयी बातम्या व माहिती देऊन सावधगिरी किंवा सूचना करते त्याबद्दल दही कारभारी पोर्टल चे आम्ही आभारी आहोत
    जय किसान

DISQUS: 0