Cervical Cancer Vaccine | PMC Health Department | सर्व्हायकल कॅन्सर रोधक लस खरेदी बाबत राज्य सरकारचाच अडथळा!
| आता दिले जात आहे आचारसंहितेचे कारण
Cervical Cancer Vaccine | PMC Health Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून (Pune Municipal Corporation Health Department) 2500 सर्व्हायकल कॅन्सर रोधक लस (Cervical cancer vaccines) खरेदी करण्याबाबत सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. महापालिका शाळांतील (PMC School) आठवी आणि नववीच्या मुलींना ही लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ही लस नववीच्या मुलींना दिली जाणार होती. मात्र राज्य सरकारच्या उदासीन भूमिकेने पुणे महापालिकेला ही लस खरेदी करता आली नाही. आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतरच मुलींना ही लस मिळू शकणार आहे. दरम्यान सरकारच्या उदासीनतेने मागील आर्थिक वर्षात तरतूद करून ठेवलेला निधी देखील लॅप्स झाला आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय?
मुळात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा स्त्रियांमध्ये आढळणारा कर्करोग आहे. सुरुवातीला या कर्करोगाची कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत. पण, हळूहळू शरीरातून पांढरा स्त्राव होणे, योनीमार्गातून दुर्गंधी येणे, लैंगिक संबंधांनंतर रक्तस्राव होणे यांसारखी लक्षणं असतात. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा स्त्रियांमध्ये चौथा सर्वात सामान्य कर्करोग आहे. हा कर्करोग गर्भाशयाच्या सर्वात खालच्या भागाच्या गर्भाशयाच्या पृष्ठभागावर सुरू होतो, म्हणून त्याला सर्वायकल कॅन्सर असं म्हणतात. सर्वायकल कॅन्सर हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात. पहिला स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आणि दुसरा म्हणजेच एडेनोकार्सिनोमा.