महिला दिनानिमित्त महिलांना पीएमपीचा मोफत प्रवास करता येणार नाही?
: प्रशासकीय मान्यतेविना प्रस्ताव रखडणार!
: मुख्य सभेत एकमताने दिली मंजुरी
८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून दि.०८ मार्च २०२२ या सालापासून दरवर्षी पुणे शहरातंर्गत पी.एम.पी.एम.एल.च्या सर्व मार्गावरील बस फेऱ्या संपूर्ण दिवस सर्व महिलांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात याव्यात. यामध्ये तेजस्विनी बसचा देखील समावेश आहे. सदरचा उपक्रम यावर्षी प्रमाणे दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राबविण्यात यावा. असा प्रस्ताव महिला बाल कल्याण समितीने मान्य करून तो अंतिम मंजुरीसाठी मुख्य सभेसमोर ठेवण्यात आला होता. सोमवारी सकाळी झालेल्या मुख्य सभेत तत्काळ या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. सर्व पक्षांनी एकमताने हा प्रस्ताव मान्य केला. त्यानंतर लगेच नगरसचिव विभागाने प्रस्ताव तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी आयुक्त कार्यालयात पाठवला. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत आयुक्तांनी यावर निर्णय घेतला नव्हता. आता उद्या ८ मार्च म्हणजे महिला दिन आहे. त्यामुळे महिलांना उद्या मोफत प्रवास करता येणार नाही, असे चित्र दिसते आहे. महापालिका प्रशासनाकडून हा प्रस्ताव पीएमपी कडे गेलाच नाही. महापालिका प्रशासन आणि पीएमपी प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
COMMENTS