International Women’s Day : PMP Free Bus : महिला दिनानिमित्त महिलांना पीएमपीचा  मोफत प्रवास करता येणार नाही? 

HomeपुणेBreaking News

International Women’s Day : PMP Free Bus : महिला दिनानिमित्त महिलांना पीएमपीचा  मोफत प्रवास करता येणार नाही? 

Ganesh Kumar Mule Mar 07, 2022 4:32 PM

International Women’s Day | पी. एम. सी. एम्प्लॉईज युनियन आणि पुणे मनपा कडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन! | लकी ड्रॉ मध्ये पाच महिलांना मिळाली भेट 
Women’s Day | PMC | महिला दिनानिमित्त मनपा महिला कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी
International Women’s Day : नवीन मराठी शाळेत महिला दिन साजरा

महिला दिनानिमित्त महिलांना पीएमपीचा  मोफत प्रवास करता येणार नाही?

: प्रशासकीय मान्यतेविना प्रस्ताव रखडणार!

पुणे : 8 मार्च हा जागतिक महिला दिन (International Women’s day)  म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त आणि या वर्षांपासून 8 मार्च दिवशी पीएमपीच्या (PMPML)  सर्व बसचा प्रवास शहरातील सर्व महिलांसाठी मोफत (free)  असेल. याबाबतचा प्रस्ताव महिला बाल कल्याण समितीच्या (Women and child welfare committee)  बैठकीत मान्य करण्यात आला आहे. त्यानंतर आज मुख्य सभेत देखील या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. मात्र महापालिका प्रशासनाकडून हा प्रस्ताव पीएमपी कडे गेलाच नाही. त्यामुळे महिलांना उद्या मोफत प्रवास करता येणार नाही, असे चित्र दिसते आहे. महापालिका प्रशासन आणि पीएमपी प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

: मुख्य सभेत एकमताने दिली मंजुरी

८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून दि.०८ मार्च २०२२ या सालापासून दरवर्षी पुणे शहरातंर्गत पी.एम.पी.एम.एल.च्या सर्व मार्गावरील बस फेऱ्या संपूर्ण दिवस सर्व महिलांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात याव्यात. यामध्ये तेजस्विनी बसचा देखील समावेश आहे.   सदरचा उपक्रम यावर्षी प्रमाणे दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राबविण्यात यावा. असा प्रस्ताव महिला बाल कल्याण समितीने मान्य करून तो अंतिम मंजुरीसाठी मुख्य सभेसमोर ठेवण्यात आला होता. सोमवारी सकाळी झालेल्या मुख्य सभेत तत्काळ या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. सर्व पक्षांनी एकमताने हा प्रस्ताव मान्य केला. त्यानंतर लगेच नगरसचिव विभागाने प्रस्ताव तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी आयुक्त कार्यालयात पाठवला. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत आयुक्तांनी यावर निर्णय घेतला नव्हता. आता उद्या ८ मार्च म्हणजे महिला दिन आहे. त्यामुळे महिलांना उद्या मोफत प्रवास करता येणार नाही, असे चित्र दिसते आहे.  महापालिका प्रशासनाकडून हा प्रस्ताव पीएमपी कडे गेलाच नाही.  महापालिका प्रशासन आणि पीएमपी प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0