‘UPSC’ Exam Coaching | ‘युपीएससी’ परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन | प्रवेश प्रक्रिया ४ नोव्हेंबरपासून

HomeBreaking Newssocial

‘UPSC’ Exam Coaching | ‘युपीएससी’ परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन | प्रवेश प्रक्रिया ४ नोव्हेंबरपासून

Ganesh Kumar Mule Nov 05, 2022 3:09 AM

PMC Aviation Gallery | विमानाचा पुरातन काळापासून इतिहास आणि विविध प्रतिकृती पाहायच्या असतील तर  पुणे महापालिकेच्या एव्हिएशन गॅलरीला भेट द्या!
BJP Delegation | पुणेकरांवर करवाढीचा बोजा नको | महापालिका अंदाजपत्रकाच्या पार्श्‍वभूमीवर भाजप शिष्टमंडळाची आयुक्तांकडे मागणी
Pune City Traffic | शहरातील वाहतूक बदलाबाबतचे आदेश जारी

‘युपीएससी’ परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

| प्रवेश प्रक्रिया ४ नोव्हेंबरपासून

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया ४ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज दि.४ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत भरता येणार असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.के.एस.जैन यांनी दिली आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (VASHADA) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (एसीईसी), पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) संचलित सावित्रीबाई फुले ॲकॅडमी, पुणे मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

ऑन लाईन पद्धतीने प्रवेश अर्ज दि.४ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत भरता येतील. अर्ज भरण्याची तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत दि. २५ नोव्हेंबर पर्यंत आहे. प्रवेश परीक्षा दि. ४ डिसेंबर २०२२ (ऑफलाइन पद्धतीने) घेण्यात येईल परीक्षेची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत राहील. परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना www.siac.org.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई चे संचालक डॉ. के. एस. जैन यांनी केले आहे.