Cabinet Minister Madhuri Misal | मंत्रीपद मिळताच मार्केटयार्डात पेढे भरवून जल्लोष

फुलबाजारातील बाजारघटकांना पेढे भरवून जल्लोष करताना फूलबाजार अडते असोसिएशनचे पदाधिकारी.

HomeBreaking News

Cabinet Minister Madhuri Misal | मंत्रीपद मिळताच मार्केटयार्डात पेढे भरवून जल्लोष

Ganesh Kumar Mule Dec 15, 2024 4:51 PM

Mahaparivartan Mahashakti | महापरिवर्तन महाशक्तीची दहा जागांची पहिली यादी जाहीर | संभाजी राजे छत्रपती, बच्चु कडू, राजू शेट्टी यांनी केली पहिली यादी जाहीर
Final Decision on Old Pension Scheme to be Taken in the Budget Session
5000 ST buses in the state will run on LNG instead of diesel 

Cabinet Minister Madhuri Misal | मंत्रीपद मिळताच मार्केटयार्डात पेढे भरवून जल्लोष

 

MLA Madhuri Misal – (The Karbhari News Service) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळात शहरातील पर्वती मतदार संघातील आमदार माधुरी मिसाळ यांना मंत्रीपद निश्चित झाल्यानंतर गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी जल्लोष व्यक्त करण्यात आला. फुलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरूण वीर व समन्वयक सागर भोसले यांनी फुलबाजारातील अडते, हमाल, खरेदीदार यांसह अन्य बाजार घटकांना पेढे भरवून मंत्री पदाचा आनंद व्यक्त केला. (Pune News) 

आशिया खंडातील क्रमांक एकची बाजार समिती असा नावलौकीक असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डातील तरकारी, फळे, फुले, गुळ-भुसार, केळी बाजार पर्वती विधानसभा मतदार संघात येतो. येथून निवडून आलेल्या आमदार मिसाळ यांना मंत्रीपदी वर्णी लागल्याने येत्या काळात बाजारातील सर्व अडचणी सुटून अन्य प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास असोसिएशनचे अध्यक्ष वीर यांनी व्यक्त केला.
——
नाव: श्रीमती. माधुरी मिसाळ
जन्मतारीख : 19. 04. 1964
शिक्षण : बी. कॉम.

~18 वर्षे भाजपमध्ये कार्यरत पुण्याच्या सामाजिक-राजकीय आणि पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन करण्यासाठी वचनबद्ध.

~2007- कसबा मतदारसंघ, पुणे येथे नगरसेविका म्हणून निवड
~2009 ते आत्तापर्यंत – आमदार म्हणून निवड, पर्वती मतदारसंघात सलग 4 वेळा, 2009, 2014, 2019 आणि 2024.
~ कै. सतीश मिसाळ यांच्या पत्नी
~ सतीश मिसाळ एक समर्पित, विश्वासू आणि सर्वांचे लाडके, सामाजिक कार्यकर्ते, पुण्यात भाजपचे 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. 1986 पासून कार्यरत.
~स्वातंत्र्य सेनानी केशवराव देशपांडे यांची नात.

राजकीय कारकीर्द
विधानसभा सदस्य (आमदार), पर्वती मतदारसंघ, पुणे
कार्यकाळ: 2009, 2014, 2019 आणि 2024 सलग. सलग चौथ्या टर्मसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव महिला.
पुणे महापालिकेत 22 भाजप नगरसेवक निवडून आणले, त्यामुळे महापालिकेत भाजपची सत्ता येण्यास मदत झाली, त्याच भागातील मागील 3 भाजप नगरसेवकांपेक्षा ऐतिहासिक वाढ

प्रमुख प्रकल्प:
•स्वारगेट येथील मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्ट हब
•(ESIC) 500 खाटांचे रुग्णालय
स्थानिक कामगार आणि सर्वसामान्य जनतेसाठी
. कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पु. ल. देशपांडे उद्यानातील कलाग्राम.
. स्वारगेट ते कात्रज मेट्रो,
खडकवासला ते खराडी मेट्रो
. सिंहगड रोड उड्डाणपूल
• गंगाधाम फ्लायओव्हर
•स्वारगेट उड्डाणपूल
. तळजाई वन नियोजन
. पर्वती टेकडी संवर्धन आणि वारसा नियोजन
. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी चळवळ सुरू करणे.

इतर राजकीय भूमिका
-सचिव, महाराष्ट्र प्रदेश भाजप
-सदस्य, लोकलेखा समिती, महाराष्ट्र
-पुणे शहर भाजप अध्यक्ष
-माजी सदस्य, पुणे महानगरपालिका
-विधानसभा प्रतोद

भूषवलेली पदे
संचालिका, तीर्थ रिअल इस्टेट (शहरी विकास, बांधकाम आणि पायाभूत सुविधा)
अध्यक्षा, सतीश मिसाळ एज्युकेशनल फाउंडेशनच्या ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट (शिक्षण)
. संचालिका, उद्यम को-ऑप बँक लिमिटेड (बँकिंग)
. अध्यक्षा, सतीश मिसाळ फाउंडेशन (चॅरिटी) (सामाजिक कार्य)
. माजी अध्यक्षा,विद्या को-ऑप बँक लि. (बँकिंग)
. माजी विश्वस्त, शिक्षण प्रसारक मंडळी (शिक्षण)
.1989 पासून संचालक आणि अध्यक्ष म्हणून बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत.
. 22 वर्षांपासून पायाभूत सुविधा विकास आणि बांधकाम क्षेत्रात काम करत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0