Food Festival | पुण्यात तीन दिवस सवलतीच्या दरात खरेदी करा खाद्यपदार्थ  | जाणून घ्या महापालिकेच्या फूड फेस्टिवलविषयी 

HomeBreaking Newsपुणे

Food Festival | पुण्यात तीन दिवस सवलतीच्या दरात खरेदी करा खाद्यपदार्थ  | जाणून घ्या महापालिकेच्या फूड फेस्टिवलविषयी 

Ganesh Kumar Mule Apr 27, 2023 1:44 PM

Pune Metro News | पुणे मेट्रोच्या पीसीएमसी (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका) ते भक्तीशक्ती टप्प्याचे कार्य जलद गतीने सुरु
Water cuts in Pune | येत्या गुरुवार पासून दर गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचे पाणी बंद राहणार | 20 ठिकाणी बसवले एअर वॉल 
Mumbai Pune Traffic | उद्या मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद

पुण्यात तीन दिवस सवलतीच्या दरात खरेदी करा खाद्यपदार्थ

| जाणून घ्या महापालिकेच्या फूड फेस्टिवलविषयी

पुणे | पुणे महानगरपालिका (PMC Pune) समाज विकास विभागाच्या (Social Devlopment Department) वतीने स्वनिधी महोत्सव (Swanidhi Festival) अंतर्गत तीन दिवसीय फूड फेस्टिव्हलचे (Food Festival) आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुणेकरांना (Punekar) सवलतीच्या दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. (pune municipal corporation)

केंद्र शासनाच्या आवास व शहरी कार्य मंत्रालय, नवी दिल्ली यांनी  राज्य सरकार महाराष्ट्र राज्य यांना केलेल्या विनंती प्रमाणे पंतप्रधान स्वनिधी २.० महोत्सव आयोजन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेस निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगे पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाच्या वतीने स्वानिधी महोत्सव अंतर्गत फूड फेस्टिव्हलचे आयोजन पुणे महानगरपालिका हद्दीतील परीमंडळ क्र. १ ते ५ मध्ये  २७ एप्रिल ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत आयोजित करणेत आलेला आहे. (PMC Pune Food Festival)

या निमित्ताने पुणेकरांना तीन दिवस सवलतीच्या दरात खाद्यपदार्थ व फूड फेस्टिव्हलचा आस्वाद घेता येणार आहे. यासाठी पुणे महानगरपालिका व पथ विक्रेता समितीने पुढाकार घेतला आहे.  फूड फेस्टिव्हलसाठी जास्तीत जास्त लोकांनी या फूड फेस्टिव्हलचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करणेत आले आहे. (Pune Municipal Corporation Food Festival)

– या ठिकाणी असेल महोत्सव


विश्रांतवाडी चौक – संध्या. ५.०० ते रात्री ९.०.
फोटो झिंको रस्ता पुणे स्टेशन – संध्या. ५.०० ते रात्री ९.००
नटराज खाऊगल्ली, जंगली महाराज रोड – संध्या. ५.०० ते रात्री ९.००
गोयल गंगा सिंहगड रोड – सकाळी ९.०० ते ११.००
कात्रज उद्यान (राजीव गांधी उद्यान) – संध्या. ५.०० ते रात्री ९.००
हडपसर भाजी मंडई – सकाळी ९.०० ते ११.००
तुळशीबाग / जोगेश्वरी रस्ता – सकाळी १२.०० ते १.००
सारसबाग – सकाळी ९.०० ते ११.००
हिराबाग चौक – संध्या. ५.०० ते रात्री ९.००