PMC Colony Rajewadi, Nanapeth | पीएमसी कॉलनी राजेवाडी, नानापेठ येथील येथील इमारती पाडल्या जाणार  | इमारती मोडकळीस आल्याने महापालिका प्रशासनाचा निर्णय 

HomeपुणेBreaking News

PMC Colony Rajewadi, Nanapeth | पीएमसी कॉलनी राजेवाडी, नानापेठ येथील येथील इमारती पाडल्या जाणार  | इमारती मोडकळीस आल्याने महापालिका प्रशासनाचा निर्णय 

Ganesh Kumar Mule Nov 05, 2022 8:52 AM

Hadapsar-Wagholi-Manjari Road | हडपसर-मांजरी-वाघोली रस्त्यासाठी सिरम कडून 26 कोटींचा निधी | रस्त्याला विलू पुनावाला यांचे नाव देण्याबाबत सरकारची शिफारस
New Regulations from PMC Health Department regarding Drug Bills of Contributory Medical Assistance Scheme (CHS) 
PMC Ward Offices | सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार खलाटे यांच्याकडे तर औंध बाणेर चा पदभार दापकेकर यांच्याकडे

पीएमसी कॉलनी राजेवाडी, नानापेठ येथील येथील इमारती पाडल्या जाणार

| इमारती मोडकळीस आल्याने महापालिका प्रशासनाचा निर्णय

पुणे |  पीएमसी कॉलनी राजेवाडी, नानापेठ येथील इमारतीमध्ये महापालिका कर्मचारी राहतात. त्यांना भाड्याने येथील घरे देण्यात आली आहेत. मात्र या इमारती मोडकळीस आल्याने धोकादायक ठरत आहेत. महापालिकेच्या स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये देखील हे दिसून आले आहे. त्यामुळे या इमारती पाडण्यात येणार आहेत.  याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून शहर सुधारणा समिती समोर ठेवण्यात आला आहे. यावर समितीच्या पुढील बैठकीत चर्चा होईल.
प्रशासनाच्या प्रस्तावानुसार  पीएमसी कॉलनी राजेवाडी, नानापेठ येथे ५० ते ६० वर्षे जुन्या दोन इमारती असुन येथे पुणे महानगरपालिकेच्या वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांच ४८ कुटुंबे वास्तव्यास आहेत. सदर ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजने अंतर्गत नवीन ९९ सदनिका असलेली इमारत बांधण्याचा प्रकल्प भवन विभागामार्फत करण्याचे नियोजित आहे. पी एम सी कॉलनी राजेवाडी येथील जुन्या इमारती जीर्ण अवस्थेत असुन इमारतींचे बांधकाम RCC जुने असुन या इमारतींच्या छज्जाचे कॉन्क्रिट, कॉलमचे कॉन्क्रिट तसेच प्लास्टर निघालेले असुन काही ठिकाणी लोखंडी बार
उघडे पडले आहे. तसेच इमारतींच्या भिंती व छतास बारीक चिरा पडल्याने छताचे पाणी लिकेज होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
इमारतींची जीर्ण अवस्था व पडझड अधिक असल्याकारणाने दुरुस्ती करून वापर करणे शक्य नाही. तसेच दुरुस्ती विषयक कामांचा खर्च अधिक असल्याने इमारती पाडून नव्याने बांधणे उचित होणार आहे. पीएमसी कॉलनी राजेवाडी येथे ९९ सदनिका असलेली P+६ मजल्याची इमारत बांधण्याचा प्रकल्प भवन खात्यामार्फत करण्याचा नियोजित  आहे. सदर प्रकल्पासाठी  ३७५ लक्ष इतकी तरतूद चालू वर्षामध्ये उपलब्ध असुन त्यास वित्तीय समितीची मान्यता प्राप्त आहे. तसेच भवन विभागामार्फत र.रु. १५,१५,२७,९८३/- चे पुर्वगणनपत्रक तयार करण्यात आले असुन त्यास
तांत्रिक छाननी समितीची मान्यता मिळालेली आहे. तसेच  पुंडलिक ऍण्ड पुंडलिक आर्किटेक्ट्स ऍण्ड व्हॅल्युअर्स यांचेमार्फत या इमारतीचे व्हॅल्युएशन करण्यात सांगण्यात आले आहे. ते झाल्यानंतर टेंडर प्रक्रिया करून इमारत पाडल्या जाणार आहेत.