महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या अतिरिक्त आयुक्त यांच्या ऐवजी आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आणा
| शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांची मागणी
| बदल्या न झाल्यास आंदोलनाचा इशारा
भानगिरे यांनी पुढे म्हटले आहे कि, 2012 नंतर बदल्या झाल्या. परंतु ज्या कर्मचाऱ्यांचा वशिला नाही अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. कर आकारणी कर संकलन विभागात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचा आढावा घेतल्यास सन 2010 पासून तेच तेच अधिकारी त्याच त्याच परिसरात काम करीत आहेत. परिणामी अशा अधिकाऱ्यांची त्या त्या परिसरात मक्तेदारी झालेली आहे. तसेच हाच प्रकार बदल्या करणारे खाते म्हणजेच सामान्य प्रशासन विभाग, मालमत्ता व्यवस्थापन, मुख्य लेखापाल, दक्षता विभाग अशी अत्यंत महत्वाचे विभाग याठिकाणी काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या 10 वर्षांहून अधिक काळ झाला तरी झालेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
या बाबी निदर्शनास आणून देण्याचे महत्वाचे कारण म्हणजे या पदांवर काम करणारे अधिकारी देखील आमच्या शिवाय मनपाला पर्याय नाही. अशा वल्गना खाते प्रमुखांसमोर करतात व खाते प्रमुख देखील वेळ मारून नेण्यासाठी गप्प बसतात. मनपाच्या कडे प्रतिनियुक्ती वर आलेल्या अधिकारी यांनी स्वतःचे महत्त्व वाढवण्याच्या उद्देशाने व काही गूढ हेतूने अकारण नैसर्गिकरित्या पात्र बदल्याही अडवून ठेवल्या आहेत सेवकवर्ग विभाग संपुर्ण आयुक्त यांच्या अख्यतारीत घेण्यात यावा जेणेकरून कोणताही भ्रष्टाचार न होता पारदर्शक विना वशिलेबाजी ने बदल्या होतील. इंजिनियर, कर विभाग, क्लार्क यांच्या नियमानुसार तातडीने बदल्या कराव्यात अन्यथा शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल. असे भानगिरे यांनी म्हटले आहे.