Prithviraj Sutar | सार आय टी व सायबर टेक या कंपन्यांना काळ्या यादीत टाका  | पृथ्वीराज सुतार यांचा आंदोलनाचा इशारा 

HomeपुणेBreaking News

Prithviraj Sutar | सार आय टी व सायबर टेक या कंपन्यांना काळ्या यादीत टाका  | पृथ्वीराज सुतार यांचा आंदोलनाचा इशारा 

Ganesh Kumar Mule Jun 09, 2022 3:37 PM

Multipurpose workers | महापालिकेच्या विविध खात्यात घेतले जाणार बहुउद्देशीय कामगार  | 5 जुलै पर्यंत आवश्यक कामगारांची माहिती देण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 
PMC: BJP : ती बस : महिला बाल कल्याण समितीचा निर्णय स्थायी समितीने बदलला
Administrator | PMC Pune | पुणे महापालिका प्रशासकांना मुदतवाढ कधी? | राज्य सरकारचे अजूनही आदेश नाहीत

सार आय टी व सायबर टेक या कंपन्यांना काळ्या यादीत टाका

: पृथ्वीराज सुतार यांचा आंदोलनाचा इशारा

पुणे | मिळकत करात देण्यात येत असलेली ४०% सवलत बंद करायची की नाही काढायची, केव्हापासुन बंद करायची हा निर्णय अजून प्रलंबित आहे असे असताना या सार आय टी व सायबर टेक कंपनींच्या चुकीच्या कामांमुळे पुणे शहरातील लाखो नागरिकांना चुकीची बिले मिळाली आहेत. त्यामुळे त्यांना नाहक भुर्दड बसला असून, याबाबत पुणेकर नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या कंपन्यांना काळ्या यादीत टाका.  शिवाय प्रशासनाने उर्वरीत बिल या कंपन्यांना देण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना पुणेकरांसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

सुतार यांच्या पत्रानुसार पुणेकर नागरिक हे नियमानुसार वेळेत कर भरणारे करदाते आहेत. दरवर्षी साधारण १७०० ते १९०० कोटी पर्यंतचा मिळकत कर पुणेकरांकडून पुणे मनपास प्राप्त होतो मनपाचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत हा मिळकतकर आहे, परंतु या मिळकतधारकांना प्रशासनाकडून मोठया प्रमाणात अन्याय केला जात आहे. पुणेकरांना जी ४०% सवलत सर्वसाधारण करामध्ये दिली जायची ती आता बंद करण्यात आली आहे. ती GSI मॅपींग
करणाऱ्या सार आय टी व सायबर टेक कंपनीच्या चुकीच्या कामांमुळे. या कंपनीनी कसल्याही प्रकारची शहानीशा न करता प्रत्यक्ष जागेवर न जाता पुणेकरांची ४०% सवलत चुकीचा रिपोर्ट देऊन काढली आहे.

४०% सवलत बंद करायची की नाही काढायची, केव्हापासुन बंद करायची हा निर्णय अजून प्रलंबित आहे असे असताना या सार आय टी व सायबर टेक कंपनींच्या चुकीच्या कामांमुळे पुणे शहरातील लाखो नागरिकांना चुकीची बिले मिळाली आहेत. त्यामुळे त्यांना नाहक भुर्दड बसला असून, याबाबत पुणेकर नागरिक त्रस्त झाले आहेत. करदात्या पुणेकरांना सवलत देण्याऐवजी प्रशासन चुकीचे काम करणाऱ्या कंपन्यांना पोसण्याचे काम
करीत आहे. सार आय टी व सायबर टेक या कंपन्यांनी मनपाला चुकीचे रिपोर्ट देऊन, अटी व शर्तीप्रमाणे काम न करता मनपाची आर्थिक फसवणूक केली आहे. तरी सुध्दा मनपाचे काही अधिकारी या कंपनींना त्यांचे
उर्वरीत बिल कसे मिळेल यासाठी प्रयत्न करीत आहेत.

आमची या पत्राद्वारे मागणी आहे की या कंपनीकडून पूर्वी दिलेली बिलाची रक्कम वसूल करावी, त्यांना दंड करावा, त्यांना त्यांची उर्वरीत बाकी राहीलेली रक्कम अदा न करता त्यांना काळ्या यादीत टाकावे. या सर्व चुकीच्या बीलांमुळे पुणेकरांना जो नाहक भुर्दड बसला आहे व जो नाहक त्रास झाला आहे, त्यांचे निवारण करण्यासाठी पुन्हा जागेवर जाऊन प्रशासनाने या बीलांची तपासणी करून ४०% सवलत पुन्हा
पुणेकरांना देऊन त्यांना दिलासा दयावा. जर प्रशासनाने उर्वरीत बिल या कंपन्यांना देण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना पुणेकरांसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. असे सुतार म्हणाले.