Sanjay Raut : Raj Thackeray : भाड्याच्या माणसावर भगवी शाल टाकण्याचा भाजपचा उद्योग

HomeपुणेBreaking News

Sanjay Raut : Raj Thackeray : भाड्याच्या माणसावर भगवी शाल टाकण्याचा भाजपचा उद्योग

Ganesh Kumar Mule May 05, 2022 4:32 PM

Heat of PMC Election 2022 : मोदी, पवार, ठाकरे यांच्या सभा!
Ajit Pawar Vs Raj Thackeray : अजित पवार राज ठाकरेंवर संतापले : म्हणाले, मुलाखत घेतली तेव्हा …! 
Vishwa Marathi Sammelan 2025 | विश्व मराठी संमेलनाची उद्या सांगता होणार | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती!

भाड्याच्या माणसावर भगवी शाल टाकण्याचा भाजपचा उद्योग

संजय राऊत यांची राज ठाकरे यांच्यावर टीका

पुणे : मनसे पक्ष गोंधळलेल्या स्थितीत आहे. राज ठाकरे यांची भूमिका हिंदुत्वाच्या विरोधात आहे. काल मशिदीवरील भोंगा प्रकरणामुळे पंढरपूर, शिर्डी आशा अनेक ठिकाणी काकड आरत्या होऊ शकल्या नाहीत. अनेकजण त्याचा आनंद घेत असतात. परंतु काकड आरतीचा आवाज ऐकू न आल्याने भाविकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे. भाड्याच्या माणसावर भगवी शाल टाकण्याचा भाजपचा उद्योग, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत भोंग्याबाबत पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील सभेत त्यांनी भोंगे उतरवण्याबाबत ३ तारखेचा अल्टिमेटम दिला होता. आता मात्र ईदच्या मध्ये काही अडचण येऊ नये. म्हणून ४ तारखेपर्यंत भोंगे उतरले पाहिजेत असा इशारा राज यांनी दिला. त्यानंतर जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचे आवाहन राज यांनी राज्यातील सर्व मनसैनिकांना केले आहे. त्यांचे त्याचबरोबर नुसते मशिदीवरील नाही.

 तर सर्वच प्रार्थनास्थळांवरील भोंगे उतरायला हवेत असेही त्यांनी औरंगाबादच्या सभेत सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर भोंगे लावण्यासाठी परवानगी घ्यावी. असे प्रार्थना स्थळांना पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मंदिरावरील भोंगे कालपासून बंद होऊ लागले आहेत. त्यावरच खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि भाजपवर टीका केली आहे. भाजपने राज ठाकरेंच्या हाताने हिंदुत्वाचा गळा घोठला त्यामुळं हिंदू समाज राज ठाकरे यांच्यावर नाराज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

भाजपने राज ठाकरेच्या हाताने हिंदुत्वाचा गळा घोटला 

राज ठाकरे यांनी मशिदीबरोबरच सर्व प्रार्थनास्थळांवरचे भोंगे उतरले पाहिजेत असे सांगितले होते. त्यामुळे काल काकड आरतीच्या वेळी मंदिरांवरीलही भोंगे बंद होते. त्यावर राऊत यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, भाजपने राज ठाकरेच्या हाताने हिंदुत्वाचा गळा घोटला. त्यामुळं हिंदू समाज राज ठाकरे यांच्यावर नाराज आहे.

COMMENTS

WORDPRESS: 1
  • comment-avatar
    विठ्ठल पवार राजे 4 years ago

    संजय राऊत यांचे बरोबर आहे असी इंडियन लोकांची भावना आहे. त्याचे महत्त्वाचे कारण असे आहे की इंडियन ईडीने राज ठाकरे यांची चौकशी संदर्भामध्ये कठोर पावले उचलली होती त्या संदर्भात चौकशी करू नये आणि त्या बदल्यात भाजपने राज ठाकरे यांच्या विरोधात कुठलीही कारवाई करू नये! म्हणून भाजपने राज ठाकरे यांना त्या बदल्यांमध्ये भोंगे उतरवण्याचा कार्यक्रम दिलेला आहे किंवा हिंदू मुस्लिमांनी विरोधामध्ये तेढ निर्माण होऊन इंडिया मध्ये वाढलेल्या प्रचंड महागाईच्या संग्राम मधील भारतातील जनतेचे लक्ष हटवण्यासाठी आणि भाजप ने त्यावर आपली पोळी भाजण्याच्या सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे. राज ठाकरे यांनी भोंग्याचे सोंगावर संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे.
    आणि संजय राऊत यांनी तसे उदगार काढलेले असावेत असे भारतातील तमाम लोकांचे म्हणणे आहे.
    मात्र इंडिया मध्ये चाललेल्या ह्या वाद-विवाद बाबत भारतातील भारतीय जनता आणि शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना सहभागी नाही संघटनेला भारतात मधील शेतकरी कष्टकरी कामगार आणि उपभोक्त्याच्या प्रश्‍नांच्या संदर्भात चिंता आहे त्यामुळे इंडिया मध्ये जो काही भोंग्यांचे सोंगावर जो काही भोंगळ विषय चाललेला आहे त्याला भारतामधील शेतकरी कष्टकरी कामगारांचा कोणतेही समर्थन नाही आणि असणार ही नाही.
    धन्यवाद.
    आपला किसान सेवक.

    विठ्ठल पवार राजे
    प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक
    शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य

DISQUS: 0