BJP Vs MLA Ravindra Dhangekar | आमदार धंगेकरांनी आधी पूर्ण माहिती घ्यावी! | भाजपा नेते हेमंत रासने यांचा टोला

HomeपुणेBreaking News

BJP Vs MLA Ravindra Dhangekar | आमदार धंगेकरांनी आधी पूर्ण माहिती घ्यावी! | भाजपा नेते हेमंत रासने यांचा टोला

Ganesh Kumar Mule Aug 29, 2023 3:38 PM

By election | प्रचाराच्या तोफा थंडावल्या | रविवारी मतदान | जनता कुणासोबत महाविकास आघाडी कि महायुती?
Property Tax : PMC : पुणेकरांवर कर वाढीचा बोजा नाही
Hemant Rasane | Pune Lok Sabha | पुण्यात हेमंत रासने यांच्याकडून होणार 370 किलो पेढे वाटप! कसबा मतदारसंघात भाजपाकडून विजयोत्सवाची जोरदार तयारी

BJP Vs MLA Ravindra Dhangekar | आमदार धंगेकरांनी आधी पूर्ण माहिती घ्यावी! | भाजपा नेते हेमंत रासने यांचा टोला

BJP Vs MLA Ravindra Dhangekar |  कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांचे आरोप अपूऱ्या माहितीच्या आधारे आहेत. जिल्हा नियोजन आणि नगरविकास विभागाच्या कामांचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे त्यांनी आधी संपूर्ण माहिती घ्यावी, आणि मगच आरोप करावेत, असा टोला भाजपा नेते हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी आज लगावला. (BJP Vs MLA Ravindra Dhangekar)
कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे निधीवाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप केला होता. कसबा मतदार संघातील मूलभूत सोयी-सुविधा व विकासकामांसाठी उपलब्ध झालेला निधी, अचानकपणे पर्वती मतदार संघातील कामांकरिता वळवण्याचा धक्कादायक प्रकार झाला असून, निविदा प्रक्रियेपर्यंत आलेला निधी ऐनवेळी दुसऱ्या मतदारसंघाला देणे कसब्याच्या नागरिकांवर अन्याय करणारे आहे, ते म्हणाले होते. (Kasba Consistency)
त्याला उत्तर देताना हेमंत रासने म्हणाले की, नामदार चंद्रकांतदादा पाटील हे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना समान न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. कोणावरही अन्याय करण्याची त्यांची भूमिका नसते. जिल्हा नियोजन मधून सन २०२२-२३ मध्ये लोकप्रतिनिधींनी मागणी केल्याप्रमाणे निधीचे वाटप झाले आहे. त्यामुळे अपूऱ्या माहितीच्या आधारे आरोप करणे पूर्णपणे चुकीचे आहे. (Parvati Constituency)
रासने पुढे म्हणाले की, धंगेकर यांचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. जिल्हा नियोजन आणि महापालिकेच्या माध्यमातून नगरविकासकडून करण्यात येणाऱ्या कामांचा कोणताही संबंध नाही. कसबा मतदारसंघ हा शहरी मतदारसंघ आहे. त्यामुळे इथली बहुतांश कामे नगरविकास विभागाच्या माध्यमातून महापालिका करते. दिवंगत आमदार मुक्ताताई यांनी आपल्या कार्यकाळात जी कामे दिली होती. त्या कामाचा निधी मंजूर झाला होता. त्यांच्या पश्चात पोटनिवडणुकीत रविंद्र धनगेकर निवडून आल्यानंतर त्यांनीही त्यांचीच कामे आपल्या नावाने दाखवून श्रेय लाटण्याचा प्रकार धनगेकर करत आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
——
News Title | BJP Vs MLA Ravindra Dhangekar | MLA Dhangekar should get full information first! | BJP leader Hemant Rasane’s entourage