BJP Pune On PMC Election | भारतीय जनता पार्टीची प्रभागनिहाय पदाधिकारी बैठकांची मालिका | पुणे महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग

HomeBreaking News

BJP Pune On PMC Election | भारतीय जनता पार्टीची प्रभागनिहाय पदाधिकारी बैठकांची मालिका | पुणे महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग

Ganesh Kumar Mule Dec 10, 2025 7:24 PM

Home Loan EMI | होम लोनचा EMI देखील ओझे वाटत आहे का? या स्मार्ट पद्धतींनी तुम्ही कर्जाची त्वरीत परतफेड करू शकता
Vadgaonsheri | वडगाव शेरीतील प्रश्नांबाबत महापालिका ऍक्शन मोडवर
Dr Rajendra Bhosale IAS | महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मतदान करण्याचे आयुक्तांचे आदेश

BJP Pune On PMC Election | भारतीय जनता पार्टीची प्रभागनिहाय पदाधिकारी बैठकांची मालिका | पुणे महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग

 

Pune News – (The Karbhari News Service) – आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक पातळीवर तयारीला वेग दिला असून, शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी प्रभागनिहाय पदाधिकारी बैठकींची मालिका सुरू केली आहे. आज प्रभाग क्रमांक एक ते आठ च्या बैठका पार पडल्या. पुढील चार दिवसात उर्वरित प्रभागाच्या बैठका होणार आहेत. या बैठकींच्या माध्यमातून प्रभागस्तरावरील राजकीय व संघटनात्मक तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात येत आहे. (Marathi News)

या बैठकीत बूथ रचना मजबुतीकरण, कार्यकर्त्यांची संघटनात्मक बांधणी, निवडणूक व्यवस्थापनाचे नियोजन, तसेच प्रत्येक प्रभागातील पूर्ण झालेली व प्रगतीपथावरील विकासकामे यावर सविस्तर चर्चा करण्यात येत आहे. यासोबतच आगामी काळात प्रभागात राबविण्यात येणाऱ्या नव्या आणि आवश्यक विकासकामांची रूपरेषा ठरवली जात आहे.

नागरिकांकडून थेट येणाऱ्या समस्या, स्थानिक पातळीवरील अडचणी, तसेच मतदारांच्या अपेक्षा समजून घेण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात येत आहे. या सर्व मुद्द्यांच्या आधारे आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार करण्याच्या प्रक्रियेला दिशा देण्याचे काम या बैठकीतून केले जात असल्याचे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, “बूथ स्तरापासून शहरस्तरापर्यंत मजबूत संघटन उभारणे, नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आणि विकासाभिमुख, पारदर्शक व जबाबदार महापालिकेची संकल्पना मांडणे, हेच भाजपचे उद्दिष्ट आहे.या बैठकींमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होत आहे. ”

यावेळी शहर सरचिटणीस पुनीत जोशी, सुशील मेंगडे,राघवेंद्र मानकर, विश्वास ननावरे, रवींद्र साळेगावकर, प्रिया शेंडगे, युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यन्त मोहोळ आदी उपस्थित होते

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: