महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युती नाही!
: चर्चाना पूर्णविराम
पुणे : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आगामी निवडणुकीत मनसेशी युती नाही असं स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भाजपा स्वबळावर निवडणुकीला सामोरं जाणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मनसेसोबत युती होणार नाही. हा विषय आमच्यासाठी आणि राज ठाकरेंसाठी संपला आहे. मंगळवारच्या बैठकीत यावर चर्चा झाली नाही असंही पाटील यांनी सांगितले. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून सगळेच पक्ष रणनीती आखत आहेत. त्यात महाविकास आघाडीविरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळेल. मात्र यात भाजपाला नव्या मित्राची गरज भासत असेल तर सर्वांच्या नजरा मनसे-भाजपा(BJP-MNS) युतीवर लागल्या होत्या. अनेक दिवस भाजपा-मनसे युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होत्या. परंतु आता याला पूर्णविराम मिळाला आहे.
मुंबईत भाजपाचा महापौर होणार
मागील वेळी मुंबईत आमचा महापौर झाला असता परंतु अमित शाह यांच्या सांगण्यावरुन महापौर शिवसेनेला देण्यात आला. मात्र यंदा तसं होणार नाही. मुंबईत भाजपाचा महापौर बसेल. आगामी निवडणुकीत भाजपा ११७ पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
COMMENTS