BJP focus on PMC Election | महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी ऍक्शन मोड वर

HomeBreaking News

BJP focus on PMC Election | महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी ऍक्शन मोड वर

Ganesh Kumar Mule Dec 10, 2024 12:38 PM

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी | आमदार राम सातपुते
Pune BJP | शाळांच्या बाहेरील पान टपऱ्यावर तातडीने कारवाई करा | धीरज घाटे
Sharad Pawar | शरद पवारांच्या पापाचा पाढा प्रत्येक प्रभागात वाचणार! | भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची घोषणा

BJP focus on PMC Election | महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी ऍक्शन मोड वर

| सदस्य नोंदणी अभियानाने रणशिंग फुंकणार-धीरज घाटे

Pune Municipal Corporation Election – (The Karbhari News Service) – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता पुणे महानगरपालिकेवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकविणार असल्याचे प्रतिपादन शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केले. (Pune BJP)

भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुणे शहरात ८ ही मतदारसंघात सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ होत आहे ह्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली प्रत्येक मतदारसंघात कमीत कमी ५० हजार सदस्य तसेच प्रत्येक प्रभागात कमीतकमी १० हजार सदस्य नोंदणीचा संकल्प यावेळी करण्यात आला या अभियानाचे प्रमुख म्हणून पुणे शहर सरचिटणीस राघवेंद्र उर्फ बापु मानकर यांची निवड या वेळी करण्यात आली.या साठी ८८८८००२०२४ हा क्रमांकावर मिस कॉल देऊन सदस्य होता येणार आहे.

 

या वेळी बोलताना शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले ‘ देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास दाखवत शाश्वत विकासाला प्राधान्य देत जे प्रेम भारतीय जनता पार्टीला दाखवले आहे सामान्य नागरिक भारतीय जनता पार्टी शी जोडू इच्छित आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय स्तरावर सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे त्याचा एक भाग म्हणून शहरामध्ये सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे ह्या अभियानामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करतील असा विश्वास आहे ‘

या बैठकीला सरचिटणीस पुनीत जोशी , रवींद्र साळेगावकर, वर्षा तापकीर ,सुभाष जंगले राघवेंद्र मानकर , प्रमोद कोंढरे , राजेंद्र शिळीमकर, राहुल भंडारे,महेश पुंडे, सुशील मेंगडे यांच्या सह माजी नगरसेवक शहर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0