BJP Candidate List | भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर | पर्वती, शिवाजीनगर आणि कोथरुडसाठी उमेदवार ठरले!
BJP Pune – (The Karbhari News Service) – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात भारतीय जनता पार्टीने बाजी मारली आहे. भाजपने राज्यात ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पुण्यात कोथरुड, पर्वती सारख्या विधानसभा मतदारसंघात माजी नगरसेवक इच्छुक होते. मात्र त्यांना उमेदवारी न देता भाजपने चालू आमदारांनाच भाजपने उमेदवारी दिली आहे. यामुळे माजी नगरसेवक नाराज झाले आहेत. मात्र हे माजी नगरसेवकाकडे अपक्ष लढण्याचा पर्याय शिल्लक आहे. काही लोकांनी तशी इच्छा देखील बोलून दाखवली आहे. (Vidhansabha Election)
पर्वती मतदारसंघातून आमदार माधुरी मिसाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेसाठी माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले इच्छुक होते. कोथरुड मतदारसंघासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांना उमदेवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर इच्छुक होते. छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान अजून ५ मतदारसंघासाठी उमेदवार देणे बाकी आहे. महायुती मधे या जागा कुणाला मिळतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
—-
आपल्या छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून मला पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल भा.ज.पा राष्ट्रीय व प्रदेश नेतृत्वाचे आणि महायुतीचे मन:पूर्वक आभार.
छत्रपती शिवाजीनगरच्या रहिवाशांचा आशीर्वाद, ऊर्जा आणि पाठिंबा, तसेच गेल्या ५ वर्षांत माझ्या कार्यसमूहाने सातत्याने केलेल्या विकास कार्याच्या जोरावर मला विश्वास आहे की या निवडणुकीत शिवाजीनगरचे नागरिक प्रचंड बहुमताने विजय निश्चित करतील ! मी आपल्या लोकांच्या आणि देशाच्या सेवेसाठी अधिक कठोर परिश्रम करण्याचे आपल्याला वचन देतो.
– सिद्धार्थ शिरोळे, आमदार.
—-
*माधुरी सतीश मिसाळ*
*भाजप उमेदवार पर्वती मतदारसंघ*
शिक्षण बीकॉम
2007 पुणे महापालिकेत नगरसेविका
2009, 2014, 2019 पर्वती मतदारसंघातून सलग तीनदा आमदार
सध्याच्या विधानसभेत प्रतोद अशी जबाबदारी
भाजपा, पुणे शहर माजी अध्यक्ष
लोकलेखा समिती सार्वजनिक उपक्रम समिती या समितीच्या सदस्य
पुणे महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता येण्यात महत्त्वाचा वाटा
पर्वती विधानसभा मतदारसंघातून 22 नगरसेवक निवडून आणले
विद्या सहकारी बँकेच्या माजी अध्यक्ष
उद्यम सहकारी बँक संचालिका
सतीश धोंडीबा मिसाळ प्रतिष्ठान अध्यक्ष
माजी स्थायी समिती अध्यक्ष सतीश मिसाळ यांच्या पत्नी
स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा देणाऱ्या क्रांतिकारक केशवराव देशपांडे यांची नात
*महत्त्वाची विकासकामे*
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सुरुवातीपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा
पुणे मेट्रो, स्वारगेट मल्टी मोडेल हब, सिंहगड रस्ता उड्डाणपूल, पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्राम, पर्वती देवस्थान विविध विकासकामे, तळजाई वन आराखडा, बिबवेवाडी येथे ईएसआयसी 500 बेडचे रुग्णालय
मागील तीन वेळा पर्वती मतदारसंघातील मतदारांनी मला प्रचंड बहुमताने विजयी केले. यंदा पक्षाने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला याबद्दल मी पक्षाची, महायुतीची ऋणी आहे. गेल्या पंधरा वर्षात पर्वती परिसरासाठी मी केलेल्या विकासकामांची साक्षीदार असलेले मतदार मला पुन्हा एकदा विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी देतील, याची खात्री आहे.
*माधुरी मिसाळ*
—-
COMMENTS