स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये कोठेही आणि कोणाचाही सहभाग नसल्यामुळे भाजप व संघाला काँग्रेसच्या देशभक्तांच्या नावाची ॲलर्जी | ॲड. अभय छाजेड
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वारगेट येथील देशभक्त कै केशवराव जेधे चौक येथे त्यांच्या नावात बदल केल्याबद्दल आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना ॲड. अभय छाजेड म्हणाले की, ‘‘स्वारगेट येथील उड्डाणपूलाला व चौकाला देशभक्त कै. केशवराव जेधे यांचे नाव होते. स्वारगेट येथे नविन उड्डाणपूल झाला त्याला देखील पुणे महानगरपालिकेमध्ये देखील या उड्डाणपूलाला देशभक्त कै. केशवराव जेधे उड्डाणपूल असे नाव देण्यात आले होते. भाजपाच्या स्थानिक आमदार यांनी उड्डाणपूलाला स्वत:चा फोटो व नेत्यांचे फोटो टाकून ‘‘देशभक्त’’ हे नाव काढून फक्त कै. केशवराव जेधे उड्डाणपूल असे नाव देऊन स्वत:च्या प्रसिध्दीचा प्रयत्न केला आहे.’’
यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देशभक्त कै. केशवराव जेधे यांचा फोटो व नाव टाकून बॅनर उड्डाण पूलाला लावण्यात आला.
यावेळी देशभक्त कै. केशवराव जेधे यांचे वंशज संताजी जेधे, सुभाष जेधे, कान्होजी जेधे, कमल व्यवहारे, ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर, रमेश सोनकांबळे, भरत सुराणा, अनुसया गायकवाड, उमेश कंधारे, विश्वास दिघे, सिमा महाडिक, बाळासाहेब प्रताप, कृष्णा सोनकांबळे आदी उपस्थित होते.