Bhaubij Diwali | भाऊबीज निमित्त पोस्टमन काकांचा सन्मान | भरत आणि योगिता सुराणा यांचा उपक्रम
Bhaubij Diwali | समाजाचे काही देणे लागतो या उद्धेशाने भरत सुराणा ( अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व्यापारी सेल ) व योगिता सुराणा ( सरचिटणीस, पुणे शहर महिला काँग्रेस कमिटी ) यांनी दिवाळी व भाऊबीज निमित्त मार्केटयार्ड येथील शाही शहनाई मंगल कार्यालय येथे सर्व पोस्टमन काकांचे सन्मान करून त्यांचे औक्षण करून त्यांना दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांना राशन धान्य वाटप व मिठाई अभय छाजेड, राजेंद्र भाटिया, अचल जैन, भरत सुराणा, योगिता सुराणा हस्ते वाटप करण्यात आले.
आपले विचार व्यक्त करताना अभय छाजेड म्हणले, करोनाच्या काळात सर्व लोकं आपल्या घरी होते त्यावेळी हे सर्व पोस्टमन आपल्या जीवनाची पर्वा न करता घरपोच लोकांना टपाल देण्याचे काम प्रामाणिक पणे करत होते. अस्या सर्व पोस्टमन काकांचे आपण दिवाळी निमित्त त्यांना मिठाई व धान्य किट देऊन सन्मानित भरत सुराणा व त्यांच्या पत्नी योगिता सुराणा करत आहे हे कौतुकास पद आहे.
या प्रसंगी अभय छाजेड, राजेन्द्र भाटिया, अचल जैन, भरत सुराणा व अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
आपले विचार व्यक्त करताना एक पोस्टमन काका म्हणाले, या धगधगी च्या जीवनात रोज सकाळी उठून नागरिकांना टपाल पोचवणाचे काम आम्ही करतो पण आमची दखल आज पर्यंत कोण्ही घेतली नाही. भरत सुराणा ही पहिली व्यक्ती आहे ज्यांनी आम्हाला आठवण करून आमचा सर्वांचा सन्मान केला व धान्य किट देऊन आम्हाला मदत केली याचा आम्हा सर्वांना खूप खूप आनंद वाटतो.
या प्रसंगी विलास काळे, रमेश सोनकांबळे, सुरेश चौधरी, तीलेश मोटा, अशोक जैन, विश्वास दिघे, नितीन निकम, केतन जाधव, संकेत मुनोत, शिरीराज दुग्गड, शर्मिला जैन, दूरअप्पा शेख, रजिया बेल्लारी, सीमा महाडिक, हलिमा शेख, बेबीताई राऊत, महावीर दहिभाते, विकास काळे, रमेश जाधव, सईपानपितले, संदीप सुमेरपुरिया व अनेक प्रतिष्ठित मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. सर्वांनी दिवाळी निमित्त फराळाचा आनंद घेतला.