मनपाच्या विविध पदांच्या भरतीबाबत दलालांपासून सावध राहा
| महापालिका प्रशासनाचे आवाहन
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय अभियांत्रिकी, तांत्रिक व विधी सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. त्यामुळे निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे की जाहिरात क्र.१/३९८ नुसार र्ग-२ मधील ४ पदे व वर्ग-३ दि.२०/०७/२०२२ पासुन हे उमेदवारांनी मधील ४४४ पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दि. १०/०८/२०२२ रोजी पर्यंत आहे. इच्छुक
https://pmc.gov.in/mr/
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी पुणे महानगरपालिकेच्या https://pmc.
पाहण्यास उपलब्ध आहेत.
| असे आहे मनपाचे आवाहन
प्रक्रिया पूर्ण करण्यात येते..
याद्वारे सर्व नागरिकांना/ उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे की, कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणे महानगरपालिका कर्मचारी भरतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही मध्यस्थ / दलाल / परिचित/
अपरिचित व्यक्तीशी पदभरतीबाबत आर्थिक व्यवहार अथवा इतर तत्सम स्वरुपाची देवाण-घेवाण करू नये, अशा व्यक्तींकडून नागरिकांची/उमेदवारांची दिशाभूल व फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्या स्वरुपाची फसवणूक झाल्यास त्यास पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, याची सर्व नागरिकांनी/उमेदवारांनी नोंद घ्यावी.
पुणे महानगरपालिकेत कर्मचारी भरती करावयाची झाल्यास त्याबाबतची संपूर्ण माहितीसह सविस्तर जाहिरात अधिकृत दैनिक वर्तमानपत्रांत व पुणे महानगरपालिकेच्या www.pmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर
सविस्तर प्रसिद्ध करण्यात येते. त्यानुषंगाने पुणे महानगरपलिका अस्थापने वरील वर्ग-२ व वर्ग-३ मधील सरळसेवेने पदभरती करिता जाहिरात क्र.१/३९८ दि.२०/०७/२०२२ अन्वये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहिती उपलब्ध करून घ्यावी.
—